‘फुलपाखरु’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. या मालिकेतील तिच्या भूमिकेने अनेकांची मने जिंकली. काही दिवसांपूर्वी हृताने प्रेमाची कबूली दिली होती. आता तिचा बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
हृता बॉयफ्रेंड, दिग्दर्शक प्रतिक शाहसोबत लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. तिच्या साखरपुड्यातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या व्हिडीओमध्ये ते दोघे डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षावर केला आहे. अनेक कलाकारांनी देखील हृताला शुभेच्छा दिल्या आहेत.
हृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. तिने पहिल्यांदाच प्रतिकसोबतचा फोटो शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले होते. आता हृता लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. हृताच्या साखरपुड्याला अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि आशुतोष गोखले यांनी हजेरी लावली होती.
हृता सध्या ‘मन उडू उडू झालं’ मालिकेत दिपूची भूमिका साकारताना दिसत आहे. तर प्रतिकने काही मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. त्याने ‘बेहद २’, ‘बहू बेगम’, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’, ‘तेरी मेरी एक जिंदड़ी’ मालिकांसाठी काम केले आहे.