मराठी मालिकांमुळे अभिनेत्री हृता दुर्गुळे घराघरांत पोहोचली. तिच्या अभिनयाने मराठी रसिक प्रेक्षकांना वेड लावलं. आता हृताने तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. नुकतीच हृता विवाहबंधनात अडकली आहे. डिसेंबर महिन्यात हृताने प्रतीक शहाबरोबर साखरपुडा केला होता. आता हृता-प्रतीकने लग्न करत सगळ्यांनाच गोड बातमी दिली आहे. या दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

हृताचा लग्नादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. पिवळ्या रंगाची साडी, मुंडावळ्या, पारंपरिक दागिने असा तिचा महाराष्ट्रीयन लूक या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. लग्नाच्या हॉलमध्ये प्रवेश करताच हृता भावूक झालेली या व्हिडीओमध्ये दिसते. तसेच तिला या सुखद क्षणी अश्रू देखील अनावर होताना दिसत आहेत. हृताला पाहून तिच्या आई-वडिलांचे डोळे देखील पाणावलेले या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहेत. तिचा हा सुंदर व्हिडीओ मेकअप आर्टिस्ट निशी गोडबोलेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

आणखी वाचा – VIDEO : ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या रायच्या सौंदर्याची जादू, अभिनेत्रीवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा

हृता पारंपरिक लूकमध्ये अगदी सुंदर दिसत आहे. तसेच तिच्या चेहऱ्यावरील आनंद देखील या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. इतर मुलींप्रमाणेच हृतासाठी देखील हा क्षण तिच्या आयुष्यामधील सर्वात सुंदर क्षण होता. हृता-प्रतीकने अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न केलं. काही तासांमध्येच त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

आणखी वाचा – VIDEO : प्रार्थना बेहरेचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल, लंडनमध्ये रिल करणं पडलं महागात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हृता-प्रतीकला अनेक सेलिब्रिटी मंडळींसह चाहत्यांनी देखील नव्या आयुष्यासाठी भऱभरून शुभेच्छा दिल्या. हृताने काही महिन्यांपूर्वीच एका मुलाखतीत आपल्या प्रेमाची कबुली देत बॉयफ्रेंड प्रतीक शहाची ओळख करून दिली होती. प्रतीक हा हिंदी टीव्ही क्षेत्रात कार्यरत आहे. तसेच त्याची आई मुग्धा शहा या मराठी आणि हिंदी टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.