बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशीला हॉलीवूड अभिनेत्री एन्जेलिना जॉलीच्या पदपथावर चालण्याची इच्छा आहे.
‘जिया’, ‘गर्ल, इंटरप्टेड’, ‘लारा क्रोफ्ट: टॉम्ब रेडर’ या चित्रपटांनंतर ३९ वर्षीय एन्जेलिनाने ‘इन द लॅन्ड ऑफ ब्लड अॅण्ड हनी’ या चित्रपटाने २०११ साली दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. एन्जेलिनापासून प्रभावित झालेली २८ वर्षीय हुमा म्हणाली की, आता मी चित्रपट दिग्दर्शन करणार नाही. बहुतेक वयाच्या ५५व्या वर्षी मी याचा विचार करेन. एन्जेलिना जॉलीच्या पाऊलांवर पाऊल टाकण्याचा मी विचार करतेय. तिचा भाऊ साकीब सलीमसोबत सह दिग्दर्शन करण्यास तिला आवडेल का? असे विचारले असता ती म्हणाली, माझ्या भावासोबत सह दिग्दर्शन करणे शक्य नाही. आमच्या दोघांचीही अतिशय भिन्न मते आहेत. बहुदा आम्ही एकत्र चित्रपट काम करू. असं होऊ शकतं आणि ते मलाही आवडेल.
संग्रहित लेख, दिनांक 17th Oct 2014 रोजी प्रकाशित
एन्जेलिना जॉलीच्या पदपथावर हुमा कुरेशी
बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशीला हॉलीवूड अभिनेत्री एन्जेलिना जॉलीच्या पदपथावर चालण्याची इच्छा आहे.

First published on: 17-10-2014 at 12:14 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Huma qureshi wants to go the angelina jolie way