‘पाहिले न मी तुला’ मालिकेत काम करणारी मराठमोळी अभिनेत्री वर्षा दांदले यांच्या कार अपघात झाला आहे. भंडरदरा येथील एका पुरस्कार सोहळ्याहून मुंबईला परत येताना त्यांच्या कारचा अपघात झाला. तेव्हा पासून वर्षा या अंथरुणात आहेत. सध्या डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत.

वर्षा यांनी नुकतीच ईटाइम्सला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी अपघात कसा झाला याची माहिती दिली आहे. ‘मी एका पुरस्कार सोहळ्याहून परत येत होते. माझ्यासोबत आणखी काही अभिनेत्री होत्या आणि आमच्या गाडीचा वेग नियंत्रणात होता. अचानक एक गाडी समोरुन आली आणि ती गाडी आमच्या गाडीवर येऊन आदळली. त्यानंतर काय झाले मला आठवत नाही. पण मला सगळ्यांचा आवज ऐकू येत होता. माझ्यासोबत असेल्या अभिनेत्रींना देखील दुखापत झाली होती’ असे वर्षा म्हणाल्या.
आणखी वाचा : पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा पहिल्यांदाच आले एकत्र; कोर्टात ठोकला ५० कोटींचा दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे त्या म्हणाल्या, ‘मी सध्या अंथरुणात आहे. मला काहीच करता येत नाही. डॉक्टरांनी मला आणखी काही दिवस आराम करण्यास सांगितले आहे. माझ्या डाव्या पायाला देखील दुखापत झाली आहे. माझा उजवा पाय ठिक आहे आणि त्यामुळे मला थोडी फार हालचाल करता येते. पण डॉक्टरांनी आराम करण्यास सांगितले आहे.’