मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखलं जातं. अनेक मालिका आणि चित्रपटामुळे ती नेहमीच चर्चेत असते. तिच्या कसदार अभिनयासोबतच ती फार उत्कृष्ट नृत्यांगणाही आहे. ‘वाजले की बारा’, ‘चंद्रा’ यासारख्या असंख्य तिची गाणी गाजली. ती ‘झलक दिखला जा’ या रिअॅलिटी शोचा भाग बनली आहे. या स्पर्धेत ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. या शोच्या परीक्षकाच्या भूमिकेत अभिनेत्री मधुरी दीक्षित असते. नुकतंच अमृता खानविलकरने माधुरी दीक्षित तिला का आणि कधीपासून आवडते याबद्दल भाष्य केले.

बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींचं नाव जेव्हा घेतलं जातं तेव्हा माधुरी दीक्षितचं नाव अव्वल स्थानावर येते. आपल्या सौंदर्याने आणि नृत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी ‘धक धक गर्ल’ म्हणून माधुरी दीक्षितला ओळखले जाते. माधुरी दीक्षितने आतापर्यंत अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. सध्या अमृता खानविलकर ही झलक दिखला जा या रिअॅलिटी शोमध्ये काम करत आहे. या रिअॅलिटी शोमध्ये ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. नुकतंच तिला एका मुलाखतीत तिचा प्रवास आणि माधुरी दीक्षितबद्दल विचारणा करण्यात आली.
आणखी वाचा : तब्बल २ वर्षांनी ‘आम्ही सारे खवय्ये’ प्रेक्षकांच्या भेटीला; तारीख, वेळ आणि सूत्रसंचालकही ठरले

Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Gangu Ramsay
व्यक्तिवेध: गंगू रामसे
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट
Sharad Ponkshe son sneh ponkshe movie
शरद पोंक्षेंचा मुलगा सिनेसृष्टीत करतोय पदार्पण, पहिल्याच चित्रपटात वडिलांसह काम करण्याबाबत स्नेह पोंक्षे म्हणाला…

त्याबद्दल ती म्हणाली, “आयुष्याने माझ्या पदरात जे काही टाकले आहे त्यावरुन मी बऱ्याच गोष्टी शिकले आहे. मी कधीही कोणत्याही नृत्य प्रकाराचे शिक्षण घेतलेले नाही. पण मी जेव्हा सिनेसृष्टीत प्रवेश केला त्यावेळी गणेश आचार्य, अहमद खान आणि आशिष पाटील यासारख्या गुरुंकडून मला खूप काही शिकायला मिळाले. पण यासाठी लागणारे औपचारिक प्रशिक्षण मी घेतलेले नाही.”

“मला आजही माझा पहिला परफॉर्मन्स फार चांगला आठवतोय. त्यावेळी गणेशोत्सव होता आणि आमच्याकडे पुण्यात फार धामधूम असायची. त्यावेळी मी पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये पहिल्यांदाच नृत्य केले होते. त्यावेळी नृत्याची तालीम करणे, पोशाखाची तयारी यासह अनेक गोष्टी माझ्यासाठी फारच खास होत्या. यावेळी मी माधुरी दीक्षित यांच्या २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या देवदास चित्रपटातील डोला रे डोला या गाण्यावर मी नृत्य करण्याचे ठरवले होते, असे तिने म्हटले.”

आणखी वाचा : राणादा आणि पाठकबाई लवकरच अडकणार विवाहबंधनात, अक्षया देवधरच्या बॅचलर पार्टीचे फोटो व्हायरल

“या गाण्यावर नृत्य करण्यासाठी मला त्यांच्यासारखीच पांढऱ्या रंगाची लाल बॉर्डर असलेली साडी हवी होती. त्याचा मी संपूर्ण मार्केटमध्ये शोध घेतला होता. मी माझा पहिल्या नृत्याच्या सार्वजनिक कार्यक्रमात चक्क सतरंजीवर नाचली होती आणि आता मी तिच्या समोर नृत्य सादर करत आहे, यावर मला विश्वासच बसत नाही. त्या माझ्या आदर्श आहेत. माझ्या नृत्याच्या प्रवासाचे एक वर्तुळ पूर्ण झाले. मी फार उत्साही असून त्यांनाही माझे नृत्य आवडते, त्याचा त्या आनंद घेतात याचा मला फार आनंद आहे”, असेही अमृताने सांगितले.