करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाउनमुळे सर्व लोकं घरात अडकलेली आहेत. एरवी क्रिकेटच्या मैदानात लाखो चाहत्यांच्या गराड्यात असणारे खेळाडू, सिनेमाच्या सेटवर कॅमेऱ्यामागे अभिनय करणाऱ्या अभिनेत्री/अभिनेते सर्वजण या काळात घरात राहून आपल्या परिवारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा सध्या आपल्या मुंबईच्या घरात राहत आहेत. लॉकडाउन काळात विराट-अनुष्का सोशल मीडियावर विविध प्रकारे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतात.

अनुष्का शर्माने नुकताच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर, I spotted …. A Dinosaur on the loose अशी कॅप्शन देत विराटचा डायनॉसोर स्टाईलमध्ये चालताना व्हिडीओ पोस्ट केला आहे.

अवघ्या काही मिनीटांमध्ये अनुष्काच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. काही दिवसांपूर्वी विराट कोहली आणि अनुष्का शर्माने आपल्या घरातल्या बाल्कनीत क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता.