‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोच्या पहिल्या पर्वाची स्पर्धक आणि अभिनेत्री बॉबी डार्लिंग उर्फ पाखी शर्मा हे नाव अनेकांना परिचयाचे आहे. बॉबी डार्लिंग ही आता सिनेसृष्टीत फारशी सक्रीय नसली तरी तिने अनेक आतापर्यंत अनेक चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. यामुळे तिने तिची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र तिचे आयुष्य फार संघर्षमय होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतंच बॉबी डार्लिंगने तिचा एक नवा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सध्या तिच्या या फोटोची प्रचंड चर्चा सुरु आहे. तिचा हा फोटो चित्रपटगृहातील आहे. हा पोस्ट करताना ती म्हणाली, “मला दूरदृष्टीसाठी चष्मा लावावा लागला. बर्‍याच दिवसांनी ‘चंदीगढ करे आशिकी’ हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये गेली होती. हा चित्रपट फार छान संदेश देतो. त्यामुळे तुम्हीही अवश्य पाहा.”

यासोबतच बॉबी डार्लिंगने एक खास इच्छा व्यक्त केली आहे. “जर भविष्यात कधी माझ्या आयुष्यावर बायोपिक बनली तर त्यातील मुख्य भूमिका ही अभिनेता आयुष्यमान खुरानाने साकारावी,” अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने याबाबतची एक पोस्ट शेअर केली आहे.

Video : डोळ्यात आसू, मनात हुरहुर, हरनाझ संधू ‘मिस युनिव्हर्स’ जिंकली ‘तो’ क्षण पाहिलात का?

दरम्यान बॉबी डार्लिंगच्या आयुष्यात फार चढउतार पाहायला मिळत आहे. तिला तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक संघर्षांना सामोरे जावे लागले. त्यामुळे तिला सिनेसृष्टीत काम मिळवणे कठीण झाले. बॉबी डार्लिंग ही काही वर्षांपूर्वी लिंग बदल केल्यामुळे प्रचंड चर्चेत होती. यानंतर तिने एका व्यावसायिकासोबत प्रेमविवाह केला. लग्नानंतर बराच काळ ती सिनेसृष्टीपासून दूर होती. मात्र त्यानंतर घरगुती हिंसाचाराचा आरोप करत तिने पतीसोबत घटस्फोट घेतला. तिने तिच्या आयुष्यात प्रचंड संघर्ष केला आहे.

बॉबीने तिच्या वैवाहिक जीवनात घरगुती हिंसाचाराच्या वेदना सहन केला होता. यानंतर बॉबी डार्लिंगला अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे तिला सिनेसृष्टीत काम मिळणे बंद झाले. यानंतर मात्र ती सिनेसृष्टीतून गायब झाली. यामुळे ती मी़डियासमोर, पडद्यावर किंवा कुठेही सोशल मीडियावर दिसली नाही. विशेष म्हणजे तिने कोणताही फोटो शेअर केला नव्हता. यानंतर नुकतंच बॉबीने तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. सध्या तिचा हा फोटो चर्चेचा विषय ठरत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If a biopic is made ayushmann khurrana should play my character said bobby darling nrp
First published on: 13-12-2021 at 14:20 IST