माद्रिद येथे झालेल्या १७ व्या आयफा २०१६च्या पुरस्कारांमध्ये बॉलीवूडच्या बाजीराव-मस्तानीने म्हणजेच रणवीर आणि दीपिकाने बाजी मारली. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित बाजीराव मस्तानी चित्रपटाला तब्बल  नऊ पुरस्कार तर पीकू चित्रपटाला पाच पुरस्कार मिळाले. ‘बाजीराव-मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांना सर्वोत्कृष्ट दिर्ग्दशकाचा तर रणवीर सिंगला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर दीपिका पदुकोणला पिकू या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. यापाठोपाठ पिकू चित्रपटाने सर्वाधिक म्हणजे पाच पुरस्कार मिळाले. सलमान खानची भूमिका असलेल्या ‘बजरंगी भाईजान’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला.

आयफा २०१६ पुरस्काराचे विजेते:
सर्वोत्कृष्ट चित्रपट – बजरंगी भाईजान
सर्वोत्कृष्ट अभिनेता – रणवीर सिंग (बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – दीपिका पदुकोण (पीकू)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – संजय लीला भन्साळी (बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – अनिल कपूर (दिल धडकने दो)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – प्रियांका चोप्रा (बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख अभिनेत्री – भूमी पेडणेकर (दम लगा के हायशा)
सर्वोत्कृष्ट पटकथा : जूही चतुर्वेदी (पीकू)
वुमन ऑफ द ईअर विशेष पुरस्कार : प्रियांका चोप्रा
सर्वोत्कृष्ट पदार्पण जोडी : सूरज पंचोली आणि आथिया शेट्टी
सर्वोत्कृष्ट खलनायक : दर्शन कुमार
सर्वोत्कृष्ट विनोदी भूमिका : दीपक डोब्रियाल (तनु वेड्स मनु रिर्टन्स)
सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेता) : विकी कौशल (मसान)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : मोनाली ठाकुर (मोह-मोह के धागे : दम लगा के हायशा)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : पॅपोन ( मोह-मोह के धागे : दम लगा के हायशा)
सर्वोत्कृष्ट लिरिक्स : वरुण ग्रोवर (दम लगा के हायशा)