scorecardresearch

सलमान खानला वाटतेय ईडी, इन्कम टॅक्सची भीती; म्हणाला “इकडे कमावतो आणि…”

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने घेतलेले मानधन हे या चर्चेचे कारण ठरले आहे.

सलमान खानला वाटतेय ईडी, इन्कम टॅक्सची भीती; म्हणाला “इकडे कमावतो आणि…”

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय असणाऱ्या रिअलिटी शोपैकी एक म्हणजे ‘बिग बॉस’ला ओळखले जाते. कलाविश्वातील कलाकार ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धक म्हणून एकत्र राहतात. ‘बिग बॉस’च्या घरात होणारे स्पर्धकांचे वाद, रुसवे फुगवे, खेळ, टास्क यामुळे हा शो वादग्रस्त असला तरीही तितक्याच आवडीने घराघरात पाहिला जातो. येत्या १ ऑक्टोबरपासून बिग बॉस हिंदी चे १६ वे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमातील स्पर्धकांसोबतच हा शो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानने घेतलेले मानधन हे या चर्चेचे कारण ठरले आहे.

बिग बॉसच्या प्रत्येक पर्वात सलमान खान किती फी घेतो याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. यंदाही त्याच्या कार्यक्रमाच्या मानधनाबद्दल विविध चर्चा समोर आल्या आहेत. तो या कार्यक्रमासाठी १००० कोटींचे मानधन घेणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र नुकतंच सलमानने मानधनाबद्दलच्या या चर्चांवर त्याच्या खास शैलीत उत्तर दिले आहे.
आणखी वाचा : अमेय वाघ आणि सुमीत राघवनच्या वादावर अखेर पडदा, कारण आले समोर

मला बिग बॉससाठी इतके पैसे मिळाल्याचे वृत्त खोटं आहे. “मला जर १ हजार कोटी इतके मानधन मिळाले तर मी आयुष्यात कधीही काम करणार नाही. पण एक दिवस नक्की येईल जेव्हा मला इतके मानधन मिळेल. जरी मला ते पैसे मिळाले तरी माझ्या आयुष्यात इतके खर्च आहेत की ते सर्व पैसे त्यातच संपून जातील. वकीलांची फी पण फार आहे.

त्यातच आमचे वकीलही सलमान खान आहेत. इकडे सलमान खान कमवतो आणि तिकडे सलमान खान घेऊन जातो. आले आले आले…. गेले गेले गेले…!!” असे तो मजेशीर पद्धतीने म्हणाला.

आणखी वाचा : “केमोमुळे माझे केस गेले होते अन्…” महेश मांजरेकरांनी सांगितला ‘तो’ अनुभव

त्यावर त्याला विचारले जाते की १००० कोटी नाही किमान ९९९ कोटी तरी मानधन असेलच नाही. यावर तो म्हणाला, अरे असे काहीही नाही. याचे एक तृतीयांशही नाही. तुम्ही लोक अतिशयोक्ती करून हा आकडा काढता की हजार कोटी, १ हजार कोटी… भाऊ, इन्कम टॅक्स आणि ईडीही त्याची दखल घेतात. ते येतात आणि मग वास्तव काय आहे? ते कळते, असे सलमान खान म्हणाला.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या