गेल्य़ा काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘इंडियन आयडल १२’चा ग्रॅण्ड फिनाले अखेर पार पडला आहे. या सिझनचा विजेता कोण होणार याची उत्सुकता ताणली गेली होती. अखेर पवनदीप राजनने ‘इंडियन आयडल १२’ च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. ग्रॅण्ड फिनालेमध्ये पवनदीप राजनेन इतर स्पर्धकांना दमदार टक्कर दिली आहे आणि तो विजेता ठरला आहे. इंडियन आयडल १२’च्या ट्रॉफीसोबतच पवनदीपला लक्झरी कार आणि २५ लाख रुपये बक्षीस स्वरुपात मिळाले आहेत.च्यानिमित्ताने ‘इंडियन आयडल ११’चा फिनाले पार पडला. यंदाचा फिनाने तब्बल १२ तास चालला. या १२ तासात अनेक गेस्टनी उपस्थितीने लावली आणि य़ा गेस्टसोबत स्पर्धकांनी धमाल केली.

यंदाच्या ‘इंडियन आयडल १२’ मध्ये मोठी टक्कर पाहायला मिळाली. मोठ्या संघर्षानंतर ६ स्पर्धक अंतिम फेरीमध्ये पोहचले होते. पवनदीप राजन, मोहम्मद दानिश, शनमुखाप्रिया, अरुणिता कांजीलाल, निहाल आणि सायली कांबळे या स्पर्धकांमध्ये फिनालेची चुरस रंगली. या स्पर्धेत विजेते न ठरलेल्या इतर स्पर्धकांच्या परफॉर्मन्सने देखील अनेक चाहत्यांची मनं जिंकली आहेत.


यंदाचा ‘इंडियन आयडल १२’चा सिझन हा इतर वादग्रस्त कारणांमुळे देखील चांगलाच चर्चेत आला आहे. शोमधील स्पर्धकांच्या परफॉर्मन्ससोबतच जजेस आणि उपस्थित पाहुण्यांमुळे अनेकदा या शोने प्रेक्षकांचा रोष ओढावून घेतला होता. त्यामुळे अनेकदा या शोवर टीकादेखील करण्यात आली होती.