कास्टिंग काऊच हे सिनेसृष्टीतील एक गडद वास्तव आहे जे कोणीही नाकारु शकत नाही. बॉलिवूडसह हॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री आतापर्यंत पुढे येऊन कास्टिंग काऊचबद्दल उघडपणे वक्तव्य केले आहे. नुकतंच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता केसवानी हिने कास्टिंग काऊचबद्दल मौन सोडले आहे. नुकतंच एका मुलाखतीत बॉलिवूडसह टेलिव्हिजन इंडस्ट्रीशी संबंधित अनेक धक्कादायक खुलासे तिने केले आहेत. यावेळी तिने कास्टिंग काऊचबद्दलही वक्तव्य केले.

अभिनेत्री श्वेता केसवानी हिने ‘अभिमान’, ‘कहानी घर-घर की’ आणि ‘देश में निकला होगा चांद’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या ती हॉलिवूडमध्ये तिचे नशीब आजमवताना दिसत आहे. नुकतंच श्वेताने जागरण.कॉमला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला कास्टिंग काऊचबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

Video : “हा काय संतोष जुवेकर हाय…”; सेल्फी काढण्यासाठी आलेल्या चाहत्याने उडवली अभिनेत्याची खिल्ली

त्यावर ती म्हणाली, “मी बॉलिवूडमधील काही चित्रपटात काम केले आहे. पण काही चित्रपट मी अर्ध्यावर सोडले कारण त्या चित्रपटाच्या कास्टिंगदरम्यान मला सांगण्यात आले होते की, तुला आऊटडोअर शूटसाठी एकटीला यावे लागेल. तेव्हा मी फक्त १८ वर्षांची होते. तेव्हा मी माझ्या आईसोबतच शूटींगसाठी जायचे. पण त्यावेळी मला सांगण्यात आले की तुला आईऐवजी एकट्याने प्रवास करावा लागेल.”

“त्यासोबतच मला असेही सांगण्यात आले की तुला निर्मात्यांसोबत चांगले संबंध ठेवावे लागतील. दिग्दर्शकाच्या आज्ञा तुला पाळाव्या लागतील. त्यांच्यासोबत तुला एकांतात वेळ घालवावा लागेल. ज्यावेळी मला अशा अटी घातल्या जायच्या त्यानंत मी ते चित्रपट करण्यास नकार द्यायची. याला कास्टिंग काऊच म्हणतात हे मला माहिती होते. त्यावेळी मला इशाऱ्यांनी हातवारे करुन समजवण्यात यायचे. पण मी या सगळ्यासाठी कधीही तयार झाली नाही. म्हणूनच मी चित्रपटांमध्ये कमी झळकली”, असेही तिने म्हटले.

“राजसाहेबांचं भाषण हे बाळासाहेबांची…”, ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांची पोस्ट चर्चेत

“माझ्यासोबत अनेक चित्रपटांदरम्यान हे घडले आणि त्यामुळेच मी छोट्या पडद्यावर काम करण्यास सुरुवात केली. कारण त्यावेळी छोट्या पडद्यावर काहीही कास्टिंग काऊचसारखा प्रकार घडला नव्हता. पण मला अनेकांना सांगायचे आहे की जर तुम्हाला अशापद्धतीने चुकीचे काही सांगितले जात असेल तेव्हा थोडं थांबा आणि मग निर्णय घ्या की आपल्याला अशा ठिकाणी काम करायचे नाही. पण बरेच लोक आधी या सर्व अटी स्वीकार करतात आणि मग #Metoo सारख्या प्रकरणावेळी रडतात. म्हणजेच असं कधीही नसतं की तुमच्यासोबत काही चुकीचे होत आहे आणि ज्याची तुम्हाला माहिती नाही”, असेही ती म्हणाली.