बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा लोकप्रिय अभिनेत्यापैकी एक आहे. आमिर खान आणि अभिनेत्री फातिमा सना शेख यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु होत्या. त्या दोघांचे एडिट केलेले बरेच फोटो हे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतात. त्यात आता आमिरची लाडकी लेक इरा खानचे तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

इराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरून हे फोटो शेअर केले आहेत. इराचे हे फोटो ख्रिसमस साजरा करतानाचे आहेत. इराने वडील आमिर खान आणि बॉयफ्रेंड नुपुर शिखरेसोबत ख्रिसमस साजरा केला आहे. यात आमिरने काळ्या रंगाचं टी-शर्ट आणि राखाडी रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. तर इराने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाचं जॅकेट परिधान केलं आहे. इराचा नुपुरला किस करतानाचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : घटस्फोटानंतर समांथा आणि नागा चैतन्य पहिल्यांदाच आले समोरा-समोर अन्…

या आधी इराने तिच्या स्टोरीवर एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोत इरा, आमिर आणि नुपुरसोबत पजामा पार्टी करत आहे. इरा आणि नुपुर हे गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. नुपुर हा इराचा फिटनेस ट्रेनर आहे.

आणखी वाचा : महाभारतातील भीम आर्थिक संकटात; सरकारकडे केली पेन्शनची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आमिर खान लवकरच लाल सिंह चड्ढा या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर दिसणार आहे. हा चित्रपट हा चित्रपट १९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.