सोशल मीडियावर अभिनेत्री श्वेता साळवेने तिचे काही बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. यावरून अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले. ज्यानंतर श्वेताने ट्रोलर्सचा निषेध करणारी एक पोस्ट इन्स्टाग्रामवर लिहिली आहे. यामध्ये श्वेता म्हणते की सेक्स वर्कर तिच्या मुलांच्या पालनपोषणासाठी शरीरविक्रय करते. पण अशा सेक्स वर्करला तुम्ही बॅड मॉम म्हणाल का? श्वेता साळवेने स्मोक करतानाचा एक फोटो इन्स्टावर शेअर केला आहे त्यापुढे ती म्हणते की होय मी ड्रिंक करते, स्मोक करते पण मी आई म्हणून मी वाईट नाही.
मी माझे काही फोटोज सोशल नेटवर्किंग साइट्सवर पोस्ट केल्याने मला अनेक नेटकऱ्यांनी हिणवले. पण तुम्ही मला कधी बेरोजगार असल्याचे पाहिले आहे का? मी एक अॅक्टर आहे, डान्सर आहे, मल्टिटास्किंग आई आहे. माझा मित्र परिवार मोठा आहे. या सगळ्यांना माझ्याबद्दल आपुलकी आहे आणि प्रेम आहे. माझ्या आई वडिलांनी मला चांगलं काय वाईट काय हे शिकवलं आहे. तेदेखील सिगरेट ओढतात, ड्रिंक्स घेतात. तुम्हाला दुसऱ्यांना वाईट ठरवण्याचा अधिकार कोणी दिला? असाही प्रश्न श्वेता साळवेने विचारला आहे.
माझ्या आई वडिलांनी मला चांगल्याप्रकारेच घडवले आहे. आयुष्याच्या या वळणावर मी स्वतंत्र आहे आणि आई वडिलांच्या परवानगीमुळे मला काहीही करण्याचे स्वातंत्र्य आहे. ते इतक्या खुल्या विचारांचे आहेत की मी त्यांच्यासोबत बसूनही ड्रिंक्स घेऊ शकते, स्मोक करू शकते. मी माझ्या मुलांसोबतही तसेच राहिन तुम्ही मला अडवणारे कोण? असाही प्रश्न श्वेता साळवेने विचारला आहे. श्वेता साळवेने गेल्या काही दिवसांपासून तिचे काही बोल्ड फोटो सोशल नेटवर्किंग साइट्सवर पोस्ट केले होते. ज्यानंतर तिच्यावर टीकेचा भडीमार झाला होता. या सगळ्या टीका करणाऱ्यांना श्वेता साळवेने उत्तर दिले आहे.