आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा ब्रह्मास्त्र काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरचा दुष्काळ हटवणार का याचीही उत्सुकता आहे. ‘ब्रह्मास्त्र’ची वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत होता. ११ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयान मुखर्जीने मल्टी स्टार्ससह ‘ब्रह्मास्त्र’ पूर्ण केला. रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागार्जुनसह अनेक कलाकार या चित्रपटात दिसत आहेत. तर शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर दीपिका पदुकोण या चित्रपटात रणबीर कपूरच्या आईची भूमिका साकारत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

‘ब्रह्मास्त्र’ पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर त्याचे स्पॉयलर शेअर करण्यास सुरुवात केली आहे. ‘ब्रह्मास्त्र’मध्ये दीपिका पदुकोणचीही भूमिका असल्याचा दावा चाहते करत आहेत. दीपिका पदुकोणचीही ‘ब्रह्मास्त्र’मध्ये खूप खास भूमिका आहे असा दावा प्रेक्षक करत आहेत. युजर्सचे म्हणणे आहे की दीपिकाने तिचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरच्या आईची भूमिका साकारली आहे.
आणखी वाचा- ‘ब्रह्मास्त्र’मुळे PVR ला ८०० कोटींचं नुकसान? विवेक अग्निहोत्री म्हणाले “चुकीच्या गोष्टी…”

‘ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर कपूर शिवाच्या भूमिकेत आहे, ज्याने लहानपणीच आपले आई-वडील गमावले होते. शिवा १ वर्षाचा असताना त्याची आई आगीत होरपळून मेलेली असते. शिवाच्या आईचा पूर्ण चेहरा चित्रपटात दाखवण्यात आलेला नाही पण ती दुसरी कोणी नसून दीपिका पदुकोण असल्याचे युजर्सचे म्हणणे आहे. युजर्स आता या सीनचे अनेक फोटोही सोशल मीडियावर शेअर करत आहे.

आणखी वाचा-सारा अली खानशी डेटिंगच्या चर्चांवर शुबमन गिलच्या मित्राचा मोठा खुलासा, म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका युजरने दीपिकासारखा चेहरा असलेला फोटो शेअर केला आहे. चाहत्याने सांगितले की दीपिका काही सेकंदांसाठी ‘ब्रह्मास्त्र’मध्ये दिसत आहे. तिच्या पात्राचे नाव अमृता आहे. अशा प्रकारे अनेक युजर्सनी हे फोटो शेअर केले आहेत. काही चाहत्यांनी असेही सांगितले की ते आता नक्कीच ‘ब्रह्मास्त्र’ पाहतील कारण त्यांची आवडती दीपिकाही या चित्रपटात आहे. तर काही युजर्सना मात्र दीपिकाला चित्रपटात दिसलेली नाही.