‘कॉफी विथ करण’ शोच्या १५ डिसेंबरच्या भागात आमिर खान आणि किरण राव ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी आली होती. कार्यक्रमामध्ये पहिल्यांदाच आलेल्या आमिरने बिछान्यातील करामतींसाठी स्वत:ला १० पैकी ५ गुण दिले. करण जोहर सूत्रसंचालक असलेल्या या कार्यक्रमामध्ये ‘रॅपिड फायर’ नावाचा एक प्रकार आहे. ज्यात करणने विचारलेल्या प्रश्नांना पाहुण्यांनी झटपट उत्तर द्यायचे असते. या ‘रॅपिड फायर’ प्रकारात करणने आमिरला पिता, अभिनेता आणि दिग्दर्शक यासाठी स्वत:ला १०  पैकी (१० हे सर्वात जास्त गुणांचे परिमाण आहे) गुण देण्यासाठी सांगितले असता, आमिरने ५ हे उत्तर दिले. या सर्व गोष्टींमध्ये आपण परिपूर्ण नसून सर्वसाधारण असल्याचे आमिर म्हणाला. आमिरकडून चांगल्या प्रतिसादाची आपेक्षा करत करणने त्याला बिछान्यातील करामतींसाठी स्वत:ला गुण देण्यास सांगितले. आमिरने पुन्हा ५ हेच उत्तर दिले.
उत्तर ऐकताच या कार्यक्रमामध्ये आमिरबरोबर आलेली त्याची पत्नी किरण राव त्याच्या बचावासाठी पुढे सरसावली. किरणने आमिरला २० गुण बहाल करून, तो निश्चितच ५ पेक्षा अधिक गुणांचा मानकरी असल्याचे म्हटले. मिस्टर परफेक्शनिस्ट सर्वत्र नम्रता बाळगणे ही चांगली बाब नव्हे!
सलमान खान, रणबीर कपूर आणि करिना कपूरसारख्या बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांनी करण जोहरच्या या कार्यक्रमामध्ये केलेल्या धाडसी विधानांनी हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आहे.