बॉलिवूडचा किंग खान शाहरुख हा सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे तर कधी त्याच्या खासगी आयुष्यामुळे. गेल्या काही दिवसांपूर्वी शाहरुखचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यामुळे चर्चेत होता. आता शाहरुखची मुलगी सुहाना खान चर्चेत आहे.

सुहाना खान एका बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलाला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तिचा या स्टारकिडसोबतचा फोटो सोशल मीडिवर प्रचंड व्हायरल झाला आहे. अनेकांनी ती या स्टारकिडला डेट करत असल्याचे म्हटले आहे.
आणखी वाचा : खुशखबर! ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’

सुहाना ही बॉलिवूड अभिनेते चंकी पांडे यांच्या घरची सून होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ती अहान पांडेला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुहान खान ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत सतत शेअर करताना दिसते. तिने अनेकदा अनन्या पांडेचा भाऊ अहान पांडेसोबतचे फोटो शेअर केले आहेत. आता ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत