हॉलिवूड निर्माता हार्वे वेन्स्टाइनवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्याच्या विरोधात हॉलिवूडमध्ये तीव्र विरोध केला जात आहे. नुकताच अभिनेत्री प्रियांका चोप्राला भारतातही हार्वे वेन्स्टाइन आहे का असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना फक्त एकच हार्वे वेन्स्टाइन नाहीये. असे हार्वे सगळीकडेच असतात असे तिने उत्तर दिले.

‘मला नाही वाटत भारतात फक्त एकच हार्वे आहे किंवा हॉलिवूडमध्ये फक्त हाच एक हार्वे आहे. प्रत्येक ठिकाणी अशी माणसं आहेत, जे महिलांकडून त्यांची शक्ती काढून घेण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्या क्षेत्रात पुरूषांचा अहंकार सांभाळला नाही तर आपलं करिअर नष्ट होईल असे महिलांना वाटते किंवा यांना दुखावले तर ते आपल्याला वाळीत टाकतील अशी मनात भिती असते. आपण एकटे पडू यासाठी महिला घाबरतात.’ आतापर्यंत प्रियांका चोप्रासह अँजेलिना जोली, जेनिफर लॉरेन्स, रीझ विदरस्पून, ग्वेनेथ पॅल्ट्रो या अभिनेत्रींनीही हार्वे वेन्स्टाइनबद्दल आपले मत मांडले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हार्वेने फक्त हॉलिवूडमधील अभिनेत्रींनाच लक्ष्य केले नाही तर त्याची वाईट नजर ऐश्वर्या रायवरही होती. त्याला ऐश्वर्याला एकांतात भेटायचे होते. ऐश्वर्याची आंतरराष्ट्रीय व्यवस्थापक सिमोन शेफील्डने याबाबत खुलासा देताना म्हणाली की, ”प्राइड अॅण्ड प्रिज्युडाइस’ या सिनेमाबाबत चर्चा करण्यासाठी हार्वेला ऐश्वर्याला एकांतात भेटायचे होते. तिला एकटं भेटण्यासाठी काय करता येईल, असा प्रश्नही त्याने मला विचारला. पण मी त्याला असे होऊ शकत नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर ऐश्वर्या आणि हार्वे यांच्यात अनेक भेटी झाल्या. त्या प्रत्येक भेटीत तो तिला एकांतात भेटण्याचे शर्तीचे प्रयत्न करायचा. अनेकदा त्याने मला दुसऱ्या मिटींगना जाण्यास सांगितले. पण मी कधीही गेले नाही. शिवाय एकदा त्याच्या ऑफिसमधून बाहेर पडत असताना त्याने मला बाजूला बोलावून विचारले की, ‘ऐश्वर्यापासून दूर राहण्याचे काय घेशील?’ त्याने मला भविष्यात काम मिळू न देण्याचीही धमकी दिली. पण मी कधीच ऐश्वर्याला त्याच्यासोबत एकटे सोडले नाही.’