‘दृश्यम’फेम अभिनेत्री इशिता दत्ता आणि अभिनेता वत्सल शेठ यांनी फेब्रुवारीमध्ये चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती की त्यांच्या घरी एक छोटासा पाहुणा येणार आहे. आता ती प्रतीक्षा संपली आहे आणि हे जोडपे पुन्हा एकदा पालक बनले आहे.

‘दृश्यम’ चित्रपटात अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दुसऱ्यांदा आई झाली आहे. ‘दृश्यम’ चित्रपटातील अभिनेत्री इशिता दत्ता दुसऱ्यांदा आई झाली असून तिला मुलगी झाली आहे. इशिताचा पती वत्सल शेठ हा सुद्धा सुप्रसिद्ध अभिनेता आहे.

इशिता दत्ताने एका मुलीला जन्म दिला आहे आणि तिने स्वतः इन्स्टाग्रामवर ही माहिती दिली आहे. इतकेच नाही तर पालक झालेल्या जोडप्याने चाहत्यांना त्यांच्या मुलीची झलकही दाखवली आहे.

इशिता आणि वत्सल यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक सुंदर कौटुंबिक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांची मुलगी आणि मुलगा त्यांच्याबरोबर दिसत आहेत. इशिता आणि वत्सल आधीच एका मुलाचे पालक होते आणि आता मुलीच्या जन्मानंतर त्यांचे कुटुंब पूर्ण झाले आहे. फोटोमध्ये इशिता हॉस्पिटलच्या बेडवर दिसत आहे.

या जोडप्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये मुलीचा चेहरा हार्ट इमोजिने लपवलेला आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “दोन ते चार हृदये एकत्र धडधडत आहेत. आमचे कुटुंब आता पूर्ण झाले आहे, मुलीच्या आशीर्वादाने.” चाहत्यांसह, हितचिंतक आणि जवळचे मित्र या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत. चित्रपटसृष्टीशी संबंधित लोकही त्यांना शुभेच्छा देत आहेत.

इशिता दत्ता आणि वत्सल शेठ ‘रिश्तों का सौदागर’ या शोदरम्यान एकमेकांना भेटले आणि तिथेच ते प्रेमात पडले. २०१७ मध्ये या जोडप्याने एकमेकांशी लग्न केले. २०२३ मध्ये इशिताने एका मुलाला जन्म दिला, ज्याचे नाव वायु आहे. आता दोन वर्षांनी त्यांना मुलगी झाली आहे.

दुसऱ्या प्रेग्नेंसीबद्दल इशिताने सरप्राईज दिले होते

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, वत्सल शेठ बोलत असताना म्हणाला की, हे माझ्यासाठी एक सरप्राईज होते आणि मी या सरप्राईजमुळे खूप आनंदी आहे. जेव्हा इशिताने मला प्रेग्नेंसीबद्दल सांगितले तेव्हा मी ‘अरे व्वा’ असे म्हणालो. मला काहीच समजले नाही. वडील म्हणून ही माझ्यासाठी खूप मोठी बातमी होती, म्हणून मी खूप आनंदी होतो. पुढे त्याने सांगितले की, इशिताने आमच्या खोलीत येऊन मला ही बातमी सांगितली. मला आठवते की ही त्या काळातली गोष्ट आहे, जेव्हा आमचा मुलगा वायु खूप चिडचिड करायचा. अभिनेत्याने पुढे म्हटले की, जेव्हा आम्हाला हे कळले तेव्हा आम्ही स्वतः ते समजून घेण्यासाठी वेळ काढला आणि जगाला सांगितले की, आमच्या कुटुंबातील नवीन सदस्य जुलैमध्ये येणार आहे.’ इशिता लवकरच आपल्याला अजय देवगणबरोबर आगामी ‘दृश्यम ३’ मध्ये दिसण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.