‘जब हॅरी मेट सेजल’चा दिग्दर्शक इम्तियाझ अलीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बॉलिवूडचा किंग शाहरुख खान स्पायडर मॅनसारखा बसच्या आत उलटा लटकताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख म्हणतो की ‘जर मी स्पायडर मॅन असतो.’ इम्तियाझने या व्हिडिओला कॅप्शन देताना लिहिले की, ‘बघा मला बसमध्ये कोण भेटलं.’ या व्हिडिओला आतापर्यंत ८ हजारांहून अधिक लोकांनी पाहिले आहे.
सुश्मिता सेनच्या डान्स पार्टनर बनल्या तिच्या मुली
शाहरुखचा हा सिनेमा येत्या ४ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात शाहरुखसोबत अनुष्का शर्माही दिसणार आहे. तिसऱ्यांदा अनुष्का आणि शाहरुख एकत्र सिनेमा करत आहेत. याआधी ‘रब ने बना दी जोडी’ आणि ‘जब तक है जान’ या दोन सिनेमांत त्यांनी एकत्रित काम केले होते.
नुकताच शाहरुखने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक सेल्फी शेअर केला आहे. या सेल्फीला कॅप्शन देताना त्याने लिहिले की, ‘थकवणारं पण तरीही मजेशीर चित्रीकरण केले.’ नेहमीच आनंदी राहणाऱ्या शाहरुखला जेव्हाही चित्रीकरणातून वेळ मिळतो तेव्हा तो वेळात वेळ काढून सहकाऱ्यांसोबत मजा मस्ती करत असतो. शाहरुखचा हाच स्वभाव त्याला इतरांपासून वेगळं बनवतो.
शाहरुख आणि अनुष्काच्या या सिनेमातले ‘बीच बीच में’ गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. हे या सिनेमातले दुसरे गाणे आहे. याआधी ‘राधा’ हे रोमँटिक गाणे प्रदर्शित झाले होते. ‘बीच बीच में’ हे गाणं पार्टी साँग आहे. या गाण्यात या दोघांची केमिस्ट्रीही जबरदस्त आहे. २००३ मध्ये आलेल्या ‘कल हो ना हो’ या सिनेमातले ‘इट्स द टाइम टू डिस्को’ या गाण्याची आठवण करुन देते.
या सिनेमाचा पाचवा मिनी ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे. सेजल म्हणजे अनुष्का आपली अंगठी हरवते आणि ती शोधण्यासाठी ती शाहरुखलाही भाग पाडते.