बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या शानदार अदाकारीने २१ व्या लाइफ ओके स्क्रीन पुरस्कार सोहळ्याची सुरूवात झाली. एखाद्या राजकुमारीप्रमाणे जॅकलिनचे सजलेल्या पालखीतून स्टेजवर आगमन झाले आणि ‘किक’ चित्रपटातील गाण्यावर तिने ठेका धरला. त्यानंतर आपला आगामी ‘रॉय’ चित्रपटातील नुकतेच प्रदर्शित झालेल्या ‘चिट्टीया कलाईंया’ गाण्यावर जॅकलिनने नृत्य सादर केले. ‘किक’मधील बहुचर्चित ‘जुम्मे की रात गाणे’ झाल्याशिवाय जॅकलिनची अदाकारी पूर्ण कशी होईल? अखेरीस जॅकलिन ‘जुम्मे की रात’ गाण्यावर थिरकताना दिसली. या गाण्यावर जॅकलिनचे नृत्य सुरू होताच प्रेक्षकांकडून शिट्या आणि टाळ्यांचा पाऊस पडला.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jan 2015 रोजी प्रकाशित
जॅकलिनच्या अदाकारीने स्क्रीन पुरस्कार सोहळ्याला रंगत
बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या शानदार अदाकारीने २१ व्या लाइफ ओके स्क्रीन पुरस्कार सोहळ्याची सुरूवात झाली.
First published on: 15-01-2015 at 07:30 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jacqueline fernandez kicking performance at life ok screen awards