“उगीच चुकीचा सल्ला देऊ नका”, या कारणामुळे फोटोग्राफर्सवर संतापली जान्हवी कपूर

जान्हवीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

janhvi kapoor, janhvi kapoor viral video,
जान्हवीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (Photo Credit : Varinder Chawla)

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते. दरम्यान, सध्या जान्हवीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत जान्हवी तिचे वडील बोनी कपूर यांना ओरडताना दिसत आहे. एवढंच नाही तर जान्हवी फोटोग्राफर्सवर पण संतापली आहे.

जान्हवीचा हा व्हिडीओ बॉलिवूड पेप या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत जान्हवी तिचे वडील बोनी कपूर यांच्यासोबत दिसत आहे. यावेळी फोटोग्राफर्स जान्हवी आणि बोनी कपूर यांना मास्क काढायला सांगतात. बोनी कपूर यांनी मास्क काढायल्यानंतर जान्हवी त्यांना ओरडते आणि म्हणते “मास्क काढू नका.” एवढंच नाही तर तिच्या हाताने ती त्यांना मास्क घालू लागली. तर दुसरीकडे फोटोग्राफर्स त्यांना बोलताता “काही होणार नाही.” हे ऐकताच जान्हवी बोलते
“उगीच असा चुकीचा सल्ला देऊ नका.”

जान्हवीने ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर जान्हवी ‘रुही’ आणि ‘गुंजन सक्सेना’ या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. लवकरच जान्हवी ‘गुडलक’, ‘तख्त’, ‘दोस्ताना २’ आणि ‘रणभूमि’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Janhvi kapoor stops boney kapoor from removing mask video went viral dcp

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या