बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवीचे लाखो चाहते आहेत. जान्हवी लवकरच ‘स्टार वर्सेस फूड’च्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे. या शोमध्ये जान्हवीने तिच्या आयुष्यातील काही मजेदार किस्से सांगितले आहेत. त्यापैकी एक म्हणजे, फोटोग्राफर्सपासून लपून राहण्यासाठी जान्हवी एकदा चक्क गाडीच्या डिक्कीमध्ये लपल्याचा खुलासा तिने या शोमध्ये केला आहे.

शोच्या नावाप्रमाणे ‘स्टार वर्सेस फूड’मध्ये जान्हवी जेवन बनवताना दिसणार आहे. या शो मध्ये जान्हवी तिची जवळची मैत्रिण आणि ट्रेनर नम्रता पुरोहितसोबत दिसणार आहे. नम्रताने जान्हवी आणि फोटोग्राफर्सचा एक किस्सा सांगितला. ‘एक दिवस जान्हवी जीममधून बाहेर निघत होती आणि फोटोग्राफर्स बाहेर होते. फोटोग्राफर्सने फोटो काढू नये अशी जान्हवीची इच्छा होती. त्यामुळे ती गाडीच्या डिक्कीत लपली.  ‘त्या दिवशी मला जीमला यायचे नव्हते, मला घरी थकवा जाणवत होता. त्यामुळे फोटोग्राफर्सने फोटोकाढू नये अशी इच्छा असल्याचे’, जान्हवीने सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

आणखी वाचा : ‘याला म्हणतात संस्कार’, बिग बींची नात आराध्याचा डान्सनंतर भजन गातानाचा व्हिडीओ झाला व्हायरल

जान्हवीने पुढे सांगितले की, ‘त्या दिवशी फोटोग्राफर्सला वाईट वाटले असेल. ते आमच्यासाठी खूप काम करतात. ते सगळे दुचाकीवरून आमच्या मागे येत होते. त्यानंतर आम्हाला एका खराब ठिकाणी थांबावे लागले आणि तुम्हाला माहीत आहे का मला किती वेळा माझ्या कारच्या डिक्कीत लपावे लागले? तर मी खूप वेळा कारच्या डिक्कीत लपली आहे. माझ्या गाडीत नेहमी एक घोंगडी असते. ही घोंगडी मी तेव्हा वापरते जेव्हा मला अशा ठिकाणी जावे लागते जिथे मी जाऊ नये किंवा मग ज्या व्यक्तीसोबत मी दिसायला नको तेव्हा मी ती घोंगडी वापरते.’

आणखी वाचा : ‘तारक मेहता…’मधील भिडे गुरुजी आणि टप्पूमुळे चाहत्यांची चिंता वाढली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जान्हवी आता ‘दोस्ताना २’, ‘गुड लक जॅरी’, ‘तख्त’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. या आधी जान्हवी ‘रूही’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात जान्हवीच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. या चित्रपटात जान्हवीसोबत राजकुमार राव आणि वरुण शर्मा मुख्य भूमिकेत होते.