जया बच्चन पुन्हा पडद्यावर झळकण्यास सज्ज, एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला?

जया बच्चन यांनी एकेकाळी त्यांच्या अभिनयाने अनेकांना भुरळ घातली आहे.

amitabh-bachchan-jaya-bachchan
(Photo-Instagram@amitabhbachchan)

बच्चन कुटुंबीय हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी त्यांच्या प्रोफेशनल लाइफमुळे तर कधी पर्सनल लाइफमुळे. बिग बी, महानायक अशा विविध नावाने ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांचा कलाविश्वामध्ये चांगलाच दबदबा आहे. अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणे त्यांच्या पत्नी अभिनेत्री जया बच्चन या देखील फार चर्चेत असतात. जया बच्चन यांनी एकेकाळी त्यांच्या अभिनयाने अनेकांना भुरळ घातली आहे. पण गेल्या कित्येक वर्षांपासून जया बच्चन या सिनेसृष्टीपासून दूर आहेत. मात्र आता लवकरच त्या एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

‘बॉलिवूड हंगामा’ या वेबसाईटवर दिलेल्या वृत्तानुसार, जया बच्चन या पहिल्यांदाच खलनायिकेची भूमिका साकरणार आहेत. त्यामुळे त्यांचे चाहतेही चकित झाले आहे. दिग्दर्शक करण जौहरच्या आगामी ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’ या चित्रपटात जया बच्चन या चक्क खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहेत. जया बच्चन यांनी आतापर्यंत कधीही खलनायिकेची भूमिका साकारलेली नाही. त्यामुळे त्यांना खलनायिकेच्या भूमिकेत पाहणे ही त्यांच्या चाहत्यांसाठी खास पर्वणी असणार आहे.

विशेष म्हणजे जया बच्चन यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटात विविध भूमिकेत काम केले आहे. यातील बहुतांश भूमिका या प्रमुख अभिनेत्रीच्या रुपातील होत्या. मात्र त्या चक्क खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहेत.

करण जौहर याने जया बच्चन यांच्यासमोर चित्रपटात खलनायिकेची भूमिका साकारण्याचा प्रस्ताव समोर ठेवला, तेव्हा त्यांनी लगेच मीच का? असा उलट प्रश्न करणला विचारला. त्यानंतर करणने ही भूमिका साकारण्यासाठी त्यांना फार विनंती केली. या विनंतीनंतर जया यांनी या भूमिकेसाठी होकार दिला असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान जया बच्चन यांच्यासह त्यांची सून ऐश्वर्या राय बच्चन ही एका चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत असल्याचे समोर आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jaya bachchan to play negative role for the first time in her entire career karan johar new movie nrp

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या