देशात काही काळ करोनाचं थैमान कमी झाल्यानंतर आता पुन्हा एकदा डोकं वर काढू लागलाय. आता सुप्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर विंगेट करोनाच्या जाळ्यात सापडलीय. ही बातमी समोर आल्यानंतर तिचे फॅन्स मात्र चिंतेत पडले आहेत. अभिनेत्री जेनिफर विंगेट करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर ताबडतोब तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. अभिनेत्री जेनिफरने तिच्या नव्या पोस्टमधून हेल्थ अपडेट शेअर केलीय. याशिवाय तिने तिच्या फॅन्ससाठी एक संदेश देखील दिलाय.

अभिनेत्री जेनिफर विंगेटने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर करत ही माहिती दिलीय. या फोटोमध्ये जेनिफर हसताना दिसून येतेय. चेहऱ्यावर हास्य फुलवणाऱ्या या फोटोसोबत तिने करोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. अद्याप तरी करोनाचे सौम्य लक्षण दिसून येत असले तरी तिने स्वतःला घरात क्वारंटाइन केलं असल्याचं या पोस्टमधून तिने सांगितलं आहे. त्याचप्रमाणे करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर कोणतीही भीती न बाळगता मोठ्या विश्वासाने यातून बाहेर पडणार असं देखील तिने सांगितलं. तसंच करोना माझं काही बिघडवू शकणार नाही, असं धैर्याने ती तिच्या फॅन्सना सांगितलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘डाउन झाले… आउट नाही’

या पोस्टमध्ये पुढे तिने लिहिलं, “डाउन झाले…पण आउट झाले नाही…होय, हे खरंय…करोनाने दरवाजा ठोठावलाय…मला अडकवलंय…पण मला काही सौम्य लक्षणं दिसून आली आहेत…आणि मला पूर्णपणे बरं वाटतंय…त्यामूळे लोक चिंता करत आहेत, त्यांनी कृपया चिंता करू नये…मी क्वारंटाइनमध्ये आहे…तक्रार करते आणि खातेय सुद्धा…पण पुन्हा एकदा अॅक्शनमध्ये येण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही.”

अभिनेत्री जेनिफर विंगट येत्या २० जुलैपासून ‘कोड एम’ या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीजनचं शूटिंग सुरू करणार होती. शूटिंग सुरू करण्यापूर्वी नियमाप्रमाणे तिने स्वतःची करोना चाचणी केली होती. पण तिचा हा रिपोर्ट करोना पॉझिटीव्हचा आला आणि ताबडतोब तिने स्वतःचा क्वारंटाइन केलं.