scorecardresearch

‘झलक दिखला जा-६’मध्ये प्राण यांना देण्यात येणार श्रद्धांजली

डान्स रिअॅलिटी शो ‘झलक दिखला जा-६’मधील सहभागी त्यांच्या नृत्याद्वारे दिवंगत अभिनेता प्राण यांना श्रद्धांजली अर्पित करणार आहेत. या शनिवारी हा भाग कलर्स वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

‘झलक दिखला जा-६’मध्ये प्राण यांना देण्यात येणार श्रद्धांजली

डान्स रिअॅलिटी शो ‘झलक दिखला जा-६’मधील सहभागी त्यांच्या नृत्याद्वारे दिवंगत अभिनेता प्राण यांना श्रद्धांजली अर्पित करणार आहेत. या शनिवारी हा भाग कलर्स वाहिनीवर प्रसारित होणार आहे. माधुरी, करण जोहर आणि रेमो डिसोजा हे ‘झलक दिखला जा-६’चे परिक्षण करत आहेत.
गायक शान हा  ‘जंजीर’ (१९७३) चित्रपटातील ‘यारी है इमान मेरा’ या प्रसिद्ध गाण्यावर नृत्य करताना दिसेल. याव्यतिरीक्त करणवीर बोहरा, दृष्टि धामण, सिद्धार्थ शुक्ला, मुक्ति मोहन, सना सईद, करण पटेल, लॉरीन गॉटलिएब, सोनाली आणि सुमंत हे या शोमधील टॉप १० प्रतिस्पर्धी असून तेही प्राण यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या गाण्यांवर नृत्य करणार आहेत. तसेच, एलईडी स्क्रीनवर प्राण यांच्या छायाचित्रांचा कोलाज लावण्यात येणार आहे.
आम्ही चित्रपटसृष्टीतील बहूपैलू असलेला कलाकार गमावला असून हा आमच्यासाठी मोठा तोटा आहे, असे करण जोहर शोच्या शूटींगवेळी म्हणाला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-07-2013 at 08:09 IST

संबंधित बातम्या