बॉलिवूडचे दिग्गज कॉमेडीयन जॉनी लिवरने आजवर असंख्य सिनेमांमधून विनोदाचा तडका देत प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय. जॉनी लिवर यांचे डायलॉग असो किंवा हावभाव विनोदाच्या जादूने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर कायम राज्य केलंय. त्याच्यांच पावलांवर पाऊल ठेवत आता त्यांची मुलगी जेमी तिच्या हटके कॉमेडी स्टाइलने मनोरंजन करत आहे. जेमी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून तिचे लाखो चाहते आहेत. वेगवेगळ्या सेलिब्रिटींची हुबेहुब मिमिक्री करण्यात जेमीचा हात कुणीही पकडू शकत नाही.

नुकताच जेमीने एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत ती अभिनेत्री सोनम कपूरची मिमिक्री करताना दिसत आहे. यात जेमीने कपाळावर सिंदूर लावलंय आणि ती सोनम कपूरच्या स्टाइनमध्ये बोलतेय. यात जेमी इंग्लिशमध्ये काही शहरांची आणि महागड्या गाड्यांची नावं घेत आहे. यावेळी ती सोनम कपूरच्या इंग्रजी बोलण्याच्या स्टाइलची नक्कल करत असल्याचं लक्षात येतंय. जेमीचा हा धमाल व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेकांची तिचं कौतुक केलंय.

“म्हातारी झाली तरी संस्कार नाही”; व्हायरल व्हिडीओमुळे करीना कपूर ट्रोल

उर्मिला मातोंडकरने ‘रंगीला’ सिनेमातील गाण्यात परिधान केलं होतं ‘या’ अभिनेत्याचं बनियान

‘सोनम इज हियर, मेक वे’ असं कॅप्शन जेमीने या व्हिडीओला दिलंय. जेमीच्या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिच्या व्हिडीओला पसंती दिलीय. या आधी देखील जेमीने अनेक सेलिब्रिटींची मिमिक्री केलीय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१५ सालामध्ये जेमीने ‘किस किस को प्यार करूं’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तसचं हाउसफुल 4 या सिनेमातही तिने विनोदी भूमिका साकारली होती. तर नुकत्यातच रिलीज झालेल्या ‘भूत पोलीस’ सिनेमात जेमीने साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांनी पसंती दिलीय.