दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरचे देशभरात चाहते आहेत. लवकरच ज्युनियर एनटीआर ‘आरआरआर’ या सिनेमातून झळकणार आहे. ज्युनियर एनटीआरला लक्झरी गाड्यांची आवड आहे. नुकताच त्याच्या ताफ्यात आणखी एका लक्झरी गाडीचा समावेश झालाय. एनीटीआरने देशातील पहिली लम्बोर्गिनी उरुस ग्रेफाइट कॅप्सूल ही महागडी कार खरेदी केली आहे. या गाडीची किंमत ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्युनिअर एनटीआरने बंगळूरमधील एका शोरुममधून ही कार खरेदी केलीय. एका वृत्तानुसार भारतात लम्बोर्गिनीने उरुस कॅप्सूल या गाडीला प्रीमियर सेग्‍मेंटमध्ये लॉन्च केलं आहे. ही लम्बोर्गिनी उरुस आणि लम्बोर्गिनी पीकचं प्रिमियर व्हर्जन आहे. या दोन्ही गाड्यांची भारतातील एक्स शोरुम किंमत सव्वा तीन कोटी इतकी आहे. तर ज्युनिअर एनटीआरने खरेदी केलेल्या लम्बोर्गिनी उरुस ग्रेफाइट कॅप्सूलची भारतातील किंमत अद्याप जाहीर करण्यात आली नसली तरी या नव्या गाडीची किंमत साधाणर पाच कोटी असल्याचं म्हंटलं जातंय.

हे देखील वाचा: विकी कौशल आणि कतरिना कैफच्या साखरपुड्याच्या चर्चांना पूर्णविराम, सत्य आलं समोर

ज्युनियर एनटीआरला गाड्यांची आवड आहे. काही वृत्तानुसार त्याच्याकडे पोर्श 718 केमॅन ही जवळपास दीड कोटी रुपयांची कार आहे. तसचं रेंज रोव्हर व्होग, मर्सिडीज-बेंझ जीएलएस 350 आणि बीएमडब्ल्यू 720 एलडी या महागड्या गाड्या त्याच्या ताफ्यात आहेत.

ज्युनियर एनटीआर ‘कौन बनेगा करोड़पति तेलुगू’ हा शो होस्ट करणार आहे. त्यासोबतच तो ‘आरआरआर’ सिनेमात राम चरण, अजय देवगण आणि आलिया भट्टसह मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jr ntr bought indias first lamborghini urus graphite capsule car worth 5 core kpw
First published on: 19-08-2021 at 10:21 IST