चित्रपटसृष्टीत नवीन पदार्पण करणारा दिग्दर्शक राम रमेश शर्मा दिग्दर्शित आणि भार्गव सैखीची निर्मिती असलेल्या ‘काफिरो की नमाझ’ या चित्रपटाने तिस-या लदाख आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चार पुरस्कार पटकाविले आहेत. यात सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्काराचाही समावेश आहे.
काश्मिर येथे चित्रीत करण्यात आलेल्या या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट कलाकार (कै. चंद्रहस तिवारी आणि आलोक चतुर्वेदी), सर्वोत्तम पदार्पण दिग्दर्शक पुरस्कार शर्मी यांना देण्यात आला. हे पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार चित्रपट दिग्दर्शक शाजी एन करून यांच्या हस्ते देण्यात आले. अभिनेत्री शिल्पा शुक्लाने या महोत्सवाच्या सांगता समारंभाचे सूत्रसंचालन केले. यावेळी अभिनेत्री दीप्ती नवल आणि अभिनेता रजीत कपूर उपस्थित होते. या समारंभात राकेश ओमप्रकाश मेहरा यांची पत्नी पी एस भारतीने केलेली ‘रु बा रु’ ही डोक्युमेंटरी आणि ‘ट्रान्सफरर्सः एज ऑफ एक्सटिंक्शन’ चित्रपट दाखविण्यात आला.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jul 2014 रोजी प्रकाशित
लदाख चित्रपट महोत्सवात ‘काफिरो की नमाझ’ सर्वोत्कृष्ट चित्रपट
चित्रपटसृष्टीत नवीन पदार्पण करणारा दिग्दर्शक राम रमेश शर्मा दिग्दर्शित आणि भार्गव सैखीची निर्मिती असलेल्या 'काफिरो की नमाझ' या चित्रपटाने तिस-या लदाख आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चार पुरस्कार पटकाविले आहेत.

First published on: 01-07-2014 at 12:39 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kaafiron ki namaaz wins best film award at ladakh film fest