बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील दोन नावे म्हणजे काजोल आणि करीना कपूर खान. या दोन्ही अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. सध्या त्या दोघींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये त्या दोघी भर रस्त्यात गाडीतून उतरुन एकमेकींशी गप्पा मारताना दिसत आहेत.

इन्स्टा बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजने काजोल आणि करीनाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दोघीही एकमेकींची गळाभेट घेताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी एकाच रंगाचे कपडे परिधान केले होते. दोघींनीही पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पँट परिधान केली आहे.

आणखी वाचा- ‘ही माझ्या छत्रपतींच्या शिवगर्जनेची गोष्ट आहे’, मराठी चित्रपटाच्या टीझरला राज ठाकरेंचा आवाज

दरम्यान, काजोल आणि करीना एकमेकींशी गप्पा मारत असतात. काजोल करीनाला ‘तुझा छोटा मुलगा कसा आहे?’ असा प्रश्न विचारते. त्यावर करीना, ‘एका वर्षात बरेच काही झाले आहे. आम्हाला करोना झाला होता’ असे म्हणते. पुढे काजोल चिंता व्यक्त करत, ‘त्याला करोना पण झाला होता’ असे म्हणते. त्या दोघींमध्ये संवाद सुरु असताना रस्त्यावर गर्दी होते. नंतर दोघीही आपापल्या गाडीमध्ये जाऊन बसतात.

आणखी वाचा- हृतिक रोशन आजारी गर्लफ्रेंडची अशी घेतोय काळजी, सबा आझादनं शेअर केला फोटो

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काजोल आणि करीनाने काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या चित्रपटांमध्ये ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटाचा समावेश आहे. या चित्रपटात काजोलने करिनाच्या बहिणीची भूमिका साकारली होती. पूजाचे नाव ‘पू’ दाखवण्यात आले आहे आणि काजोलचे नाव अंजली असे आहे. त्यानंतर दोघींनी ‘वी आर फॅमिली’ चित्रपटात काम केले आहे.