करोना काळात संपूर्ण जग हे आपल्या कामावर पुन्हा एकदा परतण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर या काळात चित्रपटसृष्टी त्यांचे मनोरंजन करण्याचे पूर्ण प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. यावेळी ‘वूट ओरिजनल फीट अप विथ द स्टार्स ३’ हा शो पाहायला मिळाला आहे. या शोचे सुत्रसंचालन मालिनी अग्रवाल करत आहे. या शोमुळे चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकाराला पाहता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या शोच्या आगामी एपिसोडमध्ये बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री काजोल दिसणार आहे. काजोलने तिच्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकली आहेत. यावेळी काजोलने तिच्या आणि तिच्या कुटुंबाविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. ‘मला पुस्तक वाचायला खूप आवडतं आणि मी कॉफीसोबत दिवसात कमीत कमी २ ते ३ तास पुस्तक वाचू शकते, कारण ते मला आवडतं. मला असं वाटतं की मी आता चित्रपट पाहू शकत नाही. माझ्यात ३ तासाचा एक चित्रपट पाहण्याची क्षमता नाही. पण मी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहू शकते,’ असे काजोल म्हणाली.

आणखी वाचा : मुलीच्या रिसेप्शन पार्टीमध्ये अनिल कपूरचा ‘झक्कास’ डान्स व्हायरल

पुढे काजोल म्हणाली, ‘तिला अभिनय करण्या व्यतिरिक्त चित्रपट बनवायला आवडते. तिला खायला खूप आवडतं आणि तिला पीनट बटर फार आवडत. तिला तिचे स्वत: चे इन्स्टाग्राम पेज खूप आवडत. तिचा विनोद हा फक्त तिला समजतो, तिला असं वाटतं की ती जे काही बोलते ते ९० टक्के लोकांना कळतं नाही.’

आणखी वाचा : रिया कपूरच्या रिसेप्शन पार्टीमध्ये जान्हवी आणि खूशी कपूरला पाहून नेटकरी संतापले

‘वूट ओरिजनल फीट अप विथ द स्टार्स ३’ चा हा एपिसोड २० ऑगस्ट रोजी आपल्याला वूट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. तर, काजोल काही दिवसांपूर्वी पती आणि अभिनेता अजय देवगनच्या भुज या चित्रपटाच्या प्रिमियरमध्ये दिसली होती. यावेळी त्यांची मुलगी न्यासा ही आनंदात दिसली आणि त्यामुळे ती चर्चेत आली होती

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kajol says she might leave acting and start making films in feet up with the stars 3 dcp
First published on: 19-08-2021 at 11:21 IST