अनेक वेळा अभिनेत्री लग्नाआधी प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरु असतात. श्रीदेवीं पासून ते नेहा धूपियापर्यंत अशा अनेक बॉलिवूड अभिनेत्री आहेत ज्या लग्नाआधी प्रेग्नंट असल्याचे म्हटले जात होते. आता या यादीमध्ये सहभागी झालेली अभिनेत्री म्हणजे कल्की कोचलीन. मात्र कल्की लग्नाआधीच प्रेग्नंट असल्यामुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे.

कल्की पहिल्यांदाच आई होणार आहे. मात्र बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गशी लग्न करण्यापूर्वीच आई होणार असल्यामुळे नेटकऱ्यांनी ट्रोल केल्याची खंत कल्कीने पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केली आहे. ‘आपल्या देशात लग्नाआधी आई होणाऱ्या स्त्रीबद्दल लोक त्यांची मते बनवतात. तुझा नवरा कुठे आहे? तु असं कसं करु शकतेस? तु टाईट कपडे परिधान करु नकोस असे अनेक प्रश्न विचारण्यापासून ते मला फुकटचे सल्ले देत ट्रोल करण्यात आले. तुम्ही प्रेग्नंट नसलात तरी तुम्हाल ट्रोल करणे सुरु असतंच. प्रत्येक व्यक्तीचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो’ असे कल्की म्हणाली.

आणखी वाचा : मराठी मालिकांमधील ‘या’ लोकप्रिय चिमुकलीला ओळखलंत का?

त्यानंतर कल्कीला या ट्रोलिंगचा तुझ्यावर परिणाम होतो का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने ‘मी माझ्यावर कोणत्या गोष्टींचा परिणाम होऊ देत नाही. पण माझे शेजारी सतत माझी चौकशी करत असतात. मला काय हवय, काय नको मला विचारत असतात. त्यांना माझे लग्न झाले आहे की नाही या गोष्टीचा काडीमात्र फरक पडत नाही. ते सतत माझी काळजी करत असतात’ असे कल्की पुढे म्हणाली.

आणखी वाचा : ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री आहे लग्नाआधी प्रेग्नंट

कल्की लवकरच झी ५ वर प्रदर्शित होणाऱ्या ‘भ्रम’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. कल्की आणि अनुराग यांचे २०११ मध्ये लग्न झाले होते. या दोघांनी बऱ्याच चित्रपटांसाठी एकत्र काम केले. अखेर २०१५ मध्ये या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मात्र घटस्फोटानंतरही ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गसोबतचा फोटो कल्कीने सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या रिलेशनशीपची अधिकृत घोषणा केली. आता कल्की लवकरच आई होणार आहे.