अभिनेते कमल हासन यांचा ‘विक्रम’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे, आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात २०० कोटी रुपयांपर्यंत कमाई केली आहे. या चित्रपटाला मिळालेलं यश कमल हासन सध्या एण्जॉय करताना दिसत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी ‘विक्रम’ चित्रपटाच्या टीममधील काही व्यक्तींना लाखो रुपयांचं गिफ्ट दिलं आहे. त्याचीच सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगत आहे.

आणखी वाचा – अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’चे शो रद्द, चित्रपटगृहामध्ये प्रेक्षकच नसल्यामुळे घेतला निर्णय

कमल हासन यांनी ‘विक्रम’चे दिग्दर्शक लोकेश कनगराज यांना कोट्यावधीची कार गिफ्ट केली आहे. तसेच या चित्रपटामधील त्यांचा सहकलाकार सुर्याला रोलेक्सचं घड्याळ गिफ्ट म्हणून दिलं आहे. इतकंच नव्हे तर चित्रपटाच्या १३ सहाय्यक दिग्दर्शकांना कमल हासन यांनी बाईक गिफ्ट केली आहे. त्यांनी चित्रपटाच्या टीमवर केलेला गिफ्टचा वर्षाव पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

दिग्दर्शक लोकेश कनगराज यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन कमल हासन आणि त्यांनी दिलेल्या कारसोबतचा फोटो शेअर केला आहे. तसेच कमल हासन यांचे आभार देखील मानले आहेत.

त्याचबरोबरीने अभिनेता सुर्याने घड्याळ्यासोबतचा फोटो ट्विट करत म्हटलं आहे की. “अशा एका क्षणामुळे आयुष्य सुंदर होतं. रोलेक्स घड्याळ गिफ्ट दिल्याबद्दल अण्णा तुमचे खूप आभार.”

आणखी वाचा – मराठीमध्ये आणखी एका ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा, नरवीर मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा रुपेरी पडद्यावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच सहाय्यक दिग्दर्शकांना गिफ्ट देत असतानाचा कमल हासन यांचा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘विक्रम’ला मिळालेल्या यशामुळे कमल हासन भारावून गेले आहेत. यामागे संपूर्ण टीमची मेहनत असल्यामुळे त्यांनी आनंदाने खूश होऊन सगळ्यांना गिफ्ट दिलं. यामधून कमल हासन किती दिलदार व्यक्तीमत्त्व आहे हे दिसून येतं.