तालिबान्यांवरील पोस्ट नंतर कंगना रणौतचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक; आंतरराष्ट्रीय षडयंत्र असल्याचा दावा

कंगना रणौतने स्वतः पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. कंगनाने इन्स्टाग्राम अकाउंटवरून तालिबान्यांवर आधारित एक पोस्ट शेअर केली होती.

kangana-ranaut-instagram-account-is-hacked

कंगना रणौत ही अशी अभिनेत्री आहे जी देशातील वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपलं मत परखडपणे मांडत नेहमीच चर्चेत येत असते. कंगनाचं ट्विटर अकाउंट कायमचं निलंबित करण्यात आल्यानंतर ती इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रिय झाली होती. मात्र आता तिचं इन्स्टाग्राम अकाउंट सुद्धा हॅक झाल्याचं समोर आलंय. अभिनेत्री कंगना रणौतने स्वतः पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तालिबान्यांवर आधारित एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर तिचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झालं होतं.

अभिनेत्री कंगना रणौतने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर करून ही माहिती दिली आहे. यात तिने लिहिलं, “काल रात्री मला इन्स्टाग्रामवर अलर्ट मिळाला की चीनमधील कोणीतरी माझं खातं हॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. नोटिफिकेशन देखील अचानक गायब झालं आणि आज सकाळी मी पाहिले की तालिबानवर लिहिलेल्या माझ्या सर्व पोस्ट गायब झाल्या. माझं इन्स्टाग्राम अकाउंट बंद झालं होतं.” कंगनाला जेव्हा तिचं इन्स्टाग्राम अकाउंट बंद झाल्याचं कळलं त्यानंतर तिने इन्स्टाग्राम कार्यालयात माहिती दिली. त्यानंतर तिला एक्सेस मिळाला देखील होता. पण मी जेव्हा काही लिहायला घेतलं की अकाउंटमधून मी आपोआप लॉगआउट झाले होते. नवीन स्टोरी लिहिण्यासाठी तिला शेवटी बहिणीचा फोन वापरावा लागला. कारण तिच्या मोबाईलमध्ये सुद्धा माझं अकाउंट सुरू असायचं.

kangana-ranaut-insta-story

अभिनेत्री कंगना रणौतने दावा केलाय की, तिचं इन्स्टाग्राम अकाउंट भारत नव्हे तर चीनमधून हॅक करण्याचा प्रयत्न केलाय. हे एक आंतरराष्ट्रीय षडयंत्र असल्याचं देखील तिने या स्टोरीमध्ये म्हटलंय. कंगनाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतेय. तिचे अनेक फॅन्स या पोस्टवर कमेंट्स करताना दिसून येत आहेत.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती ‘थलायवी’ चित्रपटात दिसणार आहे. या व्यतिरिक्त, कंगनाने नुकतीच तिच्या ‘धाकड’ चित्रपटाचं शूटिंग बुडापेस्टमध्ये पूर्ण केलंय आणि त्याची रॅप अप पार्टी देखील पार पडली. कंगनाने या पार्टीत पारदर्शक ब्रलेट आणि पांढरी पँट परिधान करत इन्स्टाग्रामवर त्याचे फोटो शेअर केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kangana ranaut alleged that her instagram account is hacked from china said this is international conspiracy prp