अभिनेत्री कंगना रणौत आणि अभिनेता हृतिक रोशन यांच्यातील वाद काही महिन्यांपूर्वी चांगलाच गाजला होता. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केल्यानंतर या दोघांमधील वाद आता संपला असल्याचे वाटत असतानाच कंगनाने पुन्हा एकदा या वादाला तोंड फोडले आहे. लवकरच बॉलिवूडची ही ‘क्वीन’ रजत शर्माच्या ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात दिसणार आहे. याचा एक छोटा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा : ‘या’ मराठी अभिनेत्रीने शेअर केला बाळासोबतचा पहिला सेल्फी

हृतिक रोशनला मी कोणतीही कायदेशीर नोटिस पाठवली नसल्याचे सांगत कंगना या प्रोमोमध्ये, ‘मी खूप अपमान सहन केलाय. मी अनेक रात्री रडून घालवल्या आहेत. तणावामुळे मी रात्री झोपायचेही नाही,’ असे म्हणताना दिसते. ऑनलाइन लीक झालेल्या मेलवरही तिने यावेळी भाष्य केले. ‘ते सर्व वाईट मेल माझ्या नावावर प्रसिद्ध करण्यात आले. अजूनही लोक ते सर्च करून वाचतात. या कृत्याकरता त्याने माझी माफी मागितली पाहिजे.’

वाचा : बाबा राम रहिम यांच्या समर्थकांनी मला धमकावलं होतं, बॉलिवूड अभिनेत्रीचा खुलासा

कंगनाने एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत ह्रतिकचा उल्लेख ‘सिली एक्स’ असा केला होता आणि येथूनच कंगना-हृतिकच्या वादात ठिणगी पडली. त्यावर कंगनाने आपली माफी मागावी यासाठी हृतिकने तिला नोटीस पाठविली होती. या नोटीसला प्रत्युत्तर देत कंगनाने त्याला नोटीस मागे घेण्याचा इशारा दिलेला, नाहीतर खटल्याला सामोरे जाण्यास तयार हो, असे म्हटलेले. दरम्यान, कंगनाने या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे म्हटले होते. मात्र, हृतिकने तिचे वक्तव्य धुडकावून लावत केवळ सार्वजनिक ठिकाणीच त्यांची भेट झाल्याचे म्हटलेले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranaut demands apology from hrithik roshan
First published on: 31-08-2017 at 11:27 IST