Kangana Ranaut on Allu Arjun Arrest : १३ डिसेंबरचा दिवस अल्लू अर्जुन कधीही विसरणार नाही. पुष्पा २ च्या शो दरम्यान जी काही चेंगराचेंगरी झाली त्या प्रकरणात अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला अंतरिम जामीनही मंजूर झाला. मात्र १३ डिसेंबर हा दिवस अल्लू अर्जुनसाठी काहीसा नकोशा असलेल्या आठवणीचा दिवस ठरला आहे. दरम्यान अल्लू अर्जुनची अटक आणि सुटका याबाबत प्रतिक्रिया येत आहेत. बॉलिवूडची क्वीन आणि भाजपा खासदार कंगनाने ( Kangana Ranaut ) अल्लू अर्जुनच्या अटकेबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकी काय घटना घडली?

तेलुगू सिनेमांमधील सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन सध्या “पुष्पा २: द रुल” या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ४ डिसेंबर रोजी हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये या चित्रपटाचा प्रिमियर शो ठेवण्यात आला होता. यासाठी अल्लू अर्जुन अचानक संध्या थिएटरमध्ये पोहोचल्यामुळे एकच गोंधळ उडाला. चाहत्यांनी त्याला जवळून पाहण्यासाठी धावाधाव केली. त्यामुळे चेंगराचेंगरीची दुर्घटना घडून त्यात ३५ वर्षीय महिला रेवतीचा मृत्यू झाला होता. तसंच तिचा मुलगाही गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान याप्रकरणी अल्लू अर्जूनवर गुन्हा दाखल झाला असून आज त्याला अटकही करण्यात आली होती. तसेच त्याला १४ दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर अल्लू अर्जुनने अटकेपासून सुटका मिळविण्यासाठी तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने त्याला अंतरिम जामीन मंजूर केला आहे. आता खासदार आणि अभिनेत्री कंगनाने ( Kangana Ranaut ) अल्लू अर्जुनची बाजू घेतली आहे.

Anjali Damania on Walmik Karad
Anjali Damania : संतोष देशमुख हत्याप्रकरणात अंजली दमानिया यांचा आणखी एक गौप्यस्फोट, PCR ची प्रत शेअर करत म्हणाल्या…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Manoj Jarange Patil Dhananjay Munde
“वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंचं षडयंत्र”, मनोज जरांगेंचा थेट आरोप; म्हणाले, “जातीचं पांघरून…”
Gurpatwant Singh Pannun Assassination Plot
“सात महिन्यांपासून तुरुंगात, भारतीय दूतावासातून कोणी…”, गुरपतवंत पन्नूच्या हत्येच्या कटाचा आरोप असलेल्या निखिल गुप्तांची मोठी माहिती
Accused of murdering young woman remanded in custody Pune news
पुणे : तरुणीचा खून करणाऱ्या आरोपीला कोठडी
mastermind , construction businessman murder ,
पुणे : बांधकाम व्यावसायिकाच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार अटकेत, दोन कोटींच्या खंडणीसाठी अपहरण
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी खरं सांगत नसतील तर त्यांना…”, बजरंग सोनावणेंचं वक्तव्य
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : सुरेश धस यांचा आरोप; “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी बिक्कडने पळवले, वाल्मिक कराड आणि…”

हे पण वाचा- अल्लू अर्जुनच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयात का घेतले शाहरुख खानचे नाव? जाणून घ्या

काय म्हटलं आहे कंगना रणौतने?

कंगनाने ( Kangana Ranaut ) म्हटलं आहे की, ” जे घडलं ते घडायला नको होतं. अल्लू अर्जुनला माझा पूर्ण पाठिंबा आहे. अल्लू अर्जुनला जामीन मिळाला आहे. मात्र त्याचा अर्थ असा होत नाही की हायप्रोफाईल लोकांबाबत असं घडेल. एक अभिनेता म्हणून त्यालाही जबाबदारीने वागावं लागले. मला वाटतं की थिएटर्समध्ये कसं वागावं याचे काही विशेष नियम घालून दिले गेले पाहिजेत. ज्यात प्रेक्षकांच्या सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा असला पाहिजे.” असं कंगनाने ( Kangana Ranaut ) म्हटलं आहे. कंगनाने अजेंडा आज तकमध्ये या अल्लू अर्जुनची बाजू घेतली आहे. मात्र कुणालाही जबाबदारीपासून पळता येणार नाही असंही म्हटलं आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

पुष्पा २ च्या यशाबाबत काय म्हणाली कंगना?

पुष्पा २ ला प्रचंड यश मिळतं आहे. अवघ्या सात दिवसांत सिनेमा एक हजार कोटींच्या क्लबमध्ये पोहचला आहे. याबाबत कंगनाला ( Kangana Ranaut ) विचारलं असता कंगना म्हणाली, मी पहिला भाग पाहिला होता. सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे त्यामुळे मी पुष्पा २ पाहिला नाही. या सिनेमाबाबत बोलायचं झालं म्हणजे तर हा सिनेमा उत्तम आहे असं लोकांना वाटतं आहे. हॉट लुक, सिक्स पॅक, बाईक यातून बॉलिवूड बाहेर येताना दिसत नाही. मात्र पुष्पाचं पात्र अल्लू अर्जुनने ज्या दमदार पद्धतीने साकारलं आहे. बॉलिवूडने या सिनेमापासून आणि अल्लू अर्जुनकडून काहीतरी शिकलं पाहिजे असा टोला कंगनाने ( Kangana Ranaut ) लगावला आहे.

Story img Loader