बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त राजकीय मुद्द्यांवर आपलं मत मांडल्याने चर्चेत असते. कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक मुद्द्यावर बिनधास्त बोलणाऱ्या कंगनानं आता देशात सर्वाधित चर्चेत असलेल्या नुपूर शर्मा प्रकरणावर भाष्य केलं आहे. राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपने निलंबित केलं होतं. या प्रकरणावर बोलताना कंगनानं नुपूर यांना पाठिंबा दिला आहे.

कंगनानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात भारतीय लोकशाहीबद्दल बोलत कंगनानं नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिला आहे. कंगनानं लिहिलं, “नुपूरला तिचं म्हणणं मांडण्याचं स्वतंत्र्य आहे. तिला ज्या प्रकरे धमक्या दिल्या जात आहे ते मी पाहिलं आहे. जेव्हा प्रत्येक दिवशी हिंदू देवतांना अपमानित केलं जातं तेव्हा आपण न्यायालयात न्याय मागतो. किमान आता तरी असं करू नका. हे काही अफगाणिस्तान नाही. आपला देश एक संपूर्ण व्यवस्था असलेलं सरकारकडून चालवला जातो. जे सरकार लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि त्याला लोकशाही म्हणतात. हे फक्त त्या लोकांना आठवण करून देण्यासाठी आहे जे नेहमीच विसरतात.”

दरम्यान भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर जगभरातील अनेक देशांनी यावर आक्षेप घेतला आहे. त्यानंतर भाजपनं त्यांना निलंबित केलं. या मुद्द्यावरून देशभरात बराच वाद झाला आहे. एवढंच नाही तर भारत सरकाने असं वक्तव्य करणारी व्यक्ती ही ‘फ्रिंज एलिमेंट’ म्हणजेच देशात द्वेष पसरवणारी किंवा देशाला तोडणारी असल्याचं म्हटलं आहे.

आणखी वाचा- ‘सम्राट पृथ्वीराज’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, चित्रपटाच्या अपयशावर सोनू सूदची प्रतिक्रिया चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंगनाच्या कामाबद्दल बोलायचं तर तिचा अलिकडेच प्रदर्शित झालेला ‘धाकड’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णतः अपयशी ठरला. सध्या कंगना तिचा आगामी चित्रपट ‘तेजस’च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात ती भारतीय वायू दलाच्या फायटर पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय तिनं तिचा आणखी एक चित्रपट ‘इमर्जेन्सी’चं शूटिंग देखील सुरू केलं आहे. या चित्रपटात ती भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.