कंगना रणौत आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर यांच्यामधील वाद सगळ्यांनाच ठाऊक आहे. करणबाबत प्रत्येक गोष्ट कंगना स्पष्टपणे बोलताना दिसते. ‘कॉफी विथ करण’च्या ५व्या पर्वामध्ये कंगनाने हजेरी लावली होती. यावेळी बॉलिवूडमधील घराणेशाहीला पाठिंबा देत असल्याचा आरोप तिने करणवर केला होता. आज ‘कॉफी विथ करण’चं ७वं सीझन प्रदर्शित होत आहे. त्याचपूर्वी कंगनाने सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट शेअर करत करणवर राग व्यक्त केला आहे.

आणखी वाचा – VIDEO : ‘कॉफी विथ करण’च्या शोमध्ये लग्नाच्या पहिल्या रात्रीबाबत भलतंच बोलून गेली आलिया भट्ट, व्हिडीओ व्हायरल

कंगना रणौत नक्की काय म्हणाली?
“पापा जो (करण जोहर) ‘कॉफी विथ करण’च्या सगळ्यात गाजलेल्या एपिसोडचं प्रमोशन करत आहे. कारण आज ओटीटीवर हा कार्यक्रम प्रदर्शित होईल. पापा जोला माझ्याकडून शुभेच्छा. पण या भागाचं काय? अरे चुकलंच माझं…सर्जिकल स्ट्राईक. घरात घुसून मारलं होतं ना…मी ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमामध्ये जेव्हा सहभागी झाले होते तेव्हा माझा हा एपिसोडच सर्वाधिक लोकप्रिय ठरला होता. त्यानंतर त्याला टीव्हीवर बॅन करण्यात आलं. अगदी त्यांच्या फिल्म फेअर पुरस्कारासारखं…” कंगनाने ‘कॉफी विथ करण’मधील स्वतःचा फोटो शेअर करत त्या एपिसोडची करणला आठवण करुन दिली आहे.

कंगना खरंच कधी काय बोलेल याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. ‘कॉफी विथ करण’मध्ये जेव्हा तिने हजेरी लावली तेव्हा कंगनाने करणची बोलतीच बंद केली होती. तिने करणची खिल्ली देखील उडवली. इतकंच नव्हे तर बॉलिवूडमधील घराणेशाहीवर देखील ती खुलेपणाने बोलली. त्यानंतर सोशल मीडियावर बॉलिवूडमधील घराणेशाहीचा वाद आणखीनच पेटला होता.

आणखी वाचा – अभिमानास्पद! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील दत्तू मोरेच्या ठाण्यातील चाळीला दिलं त्याचच नाव, अभिनेता म्हणतो…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकांनी सोशल मीडियाद्वारे करणवर संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. यानंतर कंगनाने करण जोहरबाबत सोशल मीडियाद्वारे अनेक पोस्ट शेअर केल्या. काही महिन्यांपूर्वीच कंगनाने म्हटलं होतं की, “माझ्या ‘लॉकअप’ या कार्यक्रमाचे जेव्हा २०० मिलियन व्ह्युज पूर्ण होतील तेव्हा पापा जो लपून-छपून रडणार आहे. पुढे-पुढे बघ काय घडतं…तुझे रडायचे दिवस जवळच आले आहेत पापा जो.” कंगनाने नवी पोस्ट शेअर करत पुन्हा एकदा करणला डिवचलं आहे.