Kanguva Box Office Collection Day 1: दिवाळीच्या दिवशी ‘सिंघम अगेन’ व ‘भूल भुलैया ३’ हे बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यानंतर या आठवड्यात बहुप्रतिक्षीत तमिळ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘कंगुवा’ गुरुवारी (१४ नोव्हेंबर रोजी) सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. दाक्षिणात्य स्टार सूर्या (Tamil Star Suriya) व बॉबी देओल (Bobby Deol) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची खूप चर्चा होती, मात्र चित्रपटाला प्रेक्षकांचा फार चांगला प्रतिसाद मिळालेला नाही.

‘कंगुवा’ हा पॅन इंडिया चित्रपट आहे. हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची प्रचंड चर्चा होती आणि अॅडव्हान्स बूकिंगही जबरदस्त झाली होती. ते सर्व पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडेल असं वाटत होतं. मात्र कमाईचे आकडे त्या तुलनेने खूप कमी आहे. बजेट पाहता चित्रपटाने पहिल्या दिवशी निराशाजनक कामगिरी केली आहे.

हेही वाचा – “माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण

‘कंगुवा’ चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी आणि व्हीएफएक्सची सगळीकडे चर्चा आहे. मात्र, तरीही चित्रपटाचं कलेक्शन कमी राहिलं. ‘कंगुवा’च्या पहिल्या दिवसाची आकडेवारी समोर आली आहे. ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘कंगुवा’ने भारतात पहिल्या दिवशी २२ कोटी रुपये कमावले आहेत. तब्बल ३५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये ‘कंगुवा’ची निर्मिती करण्यात आली आहे. पहिल्या दिवसाची कमाई कमी आहे. वीकेंडला हा चित्रपट किती कमाई करतो, याकडे निर्मात्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – “मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘कंगुवा’मध्ये कलाकारांची मांदियाळी

‘कंगुवा’मध्ये सूर्या मुख्य भूमिकेत आहे. बॉबी देओल, दिशा पटानी, योगी बाबू, आनंदराज, रवी राघवेंद्र, केएस रवी कुमार, जगपती बाबू, रेडिन किंग्सले, कोवई सरला, नटराजन सुब्रमण्यम आणि बीएस अविनाश या कलाकारांनी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.