दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कन्नड अभिनेता नागभूषणच्या कारने बंगळूरूमध्ये फुटपाथवरून चालणाऱ्या जोडप्याला शनिवारी रात्री धडक दिली. या अपघातामध्ये महिलेचा मृत्यू झाला असून, तिच्या पतीची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. या अपघातानंतर पोलिसांनी अभिनेत्यावर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : प्रियांका चोप्राच्या आईने शेअर केला परिणीती-राघवच्या लग्नातील Unseen फोटो, म्हणाल्या…

अभिनेता नागभूषणवर या प्रकरणी बंगळुरूमधील कुमारस्वामी ट्राफिक पोलीस स्थानकात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. शनिवारी रात्री ९.४५ च्या सुमारास ही घटना घडली. संबंधित जोडपं वसंतपुरा मेन रोडच्या फुटपाथवरून चालत होतं. त्यावेळी नागभूषणच्या कारने त्यांना धडक दिली. जोडप्याला धडक दिल्यावर पुढे जाऊन अभिनेत्याची कार विजेच्या खांबाला धडकली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

हेही वाचा : Video “कधीही विसरता न येणारा प्रवास”; रिंकू राजगुरुने शेअर केला केदारनाथ ट्रीपचा अनसिन व्हिडिओ, म्हणाली…

अभिनेता नागभूषण उत्तराहल्लीहून कोननकुंटेकडे जात असताना हा अपघात झाला. अपघातामध्ये ४८ वर्षीय महिलेचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. तसेच तिच्या पतीच्या दोन्ही पायांना, डोक्याला व पोटाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर नागभूषण स्वत: जखमी दाम्पत्याला रुग्णालयात घेऊन गेला होता.

हेही वाचा : शिवानी रांगोळेच्या ऑनस्क्रीन लग्नाबाबत विराजस कुलकर्णीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया, पोस्ट शेअर करत म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नागभूषणने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. २०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘संकष्ट करा गणपती’ या चित्रपटामधून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्याचा ‘तगारू पल्या’ हा बहुचर्चित चित्रपट नोव्हेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.