दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी आली आहे. कन्नड चित्रपट अभिनेता विजय राघवेंद्र याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याची पत्नी स्पंदना राघवेंद्रचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. स्पंदनाचा बँकॉक येथील रुग्णालयात मृत्यू झाला. ती कुटुंबासह थायलंडमध्ये असताना ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

अधिकारी असून अभिनेत्रीशी लग्न कसं जमलं? समीर वानखेडे म्हणाले, “मी क्रांतीला…”

राघवेंद्रचा भाऊ मुरली यांनी सोमवारी स्पंदनाच्या मृत्यूची माहिती दिली आहे. स्पंदना तिच्या कुटुंबासोबत थायलंडमध्ये सुट्टीवर गेली होती. “ती नेहमीप्रमाणे झोपली पण उठली नाही. माझा भाऊ आता बँकॉकमध्ये आहे आणि आम्ही त्यांच्याकडून येणाऱ्या माहितीची वाट पाहत आहोत,” असं मुरली म्हणाले.

शाहरुख खान की नवाब मलिक, सर्वात जास्त राग कुणाचा येतो? समीर वानखेडे म्हणाले, “कुठला…”

‘इंडियन एक्सप्रेसने’ कुटुंबातील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, स्पंदनाचा रक्तदाब कमी झाला होता, ज्यामुळे तिला हृदयविकाराचा झटका आला आणि मृत्यू झाला. ती आज सोमवारी भारतात परतणार होती आणि एका चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सहभागी होणार होती. पण त्याआधीच तिचं निधन झालं, अशीही माहिती समोर येत आहे. काँग्रेसचे आमदार बीके हरिप्रसाद यांनी सोमवारी बंगळुरूमध्ये कुटुंबाची भेट घेतली. कुटुंबीय स्पंदनाच्या शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत आणि मंगळवारपर्यंत मृतदेह बंगळुरूला पोहोचण्याची अपेक्षा आहे.

View this post on Instagram

A post shared by Vijay Raghavendra (@raagu.vijay)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निवृत्त पोलीस अधिकारी बी के शिवराम यांची मुलगी स्पंदनाने २००७ मध्ये विजयशी लग्न केले. या जोडप्याला एक मुलगा आहे. विजय कन्नड चित्रपटांमध्ये अभिनेता आणि गायक म्हणून काम करत आहे. ‘शिवयोगी श्री पुट्टयज्जा’ या चित्रपटासाठी त्याला २०१६ चा कर्नाटक राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला होता. तो बिग बॉस कन्नडचा पहिला सीझनचा विजेता आहे.