माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी नुकतीच लोकप्रिय मराठी चॅट शो ‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये हजेरी लावली. यावेळी अवधूत गुप्तेने विचारलेल्या अनेक प्रश्नांची त्यांनी दिलखुलास उत्तरं दिली. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात वानखेडेंनी अटक केली होती. तसेच त्यांचा नवाब मलिकांचा वादही खूप गाजला होता. या दोघांबद्दल प्रश्न विचारल्यावर वानखेडेंची प्रतिक्रिया काय होती, पाहुयात.

प्रसिद्ध अभिनेते आहेत अमिताभ बच्चन यांचे साडू, दोघांनी दोन चित्रपटात केलंय एकत्र काम, फोटो पाहून ओळखलंत का?

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी तत्कालीन मुंबई एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. मात्र, नंतरच्या काळात नवाब मलिक यांनाच तुरुंगात जावं लागलं होतं. यावरून समीर यांना एक प्रश्न विचारण्यात आला. सर्वात जास्त राग कुणाचा येतो? शाहरुख खान की नवाब मलिक असा प्रश्न अवधूत गुप्तेने विचारला. हा प्रश्न विचारताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. समीर वानखेडेंच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून हा सामान्य प्रश्न असल्याचं अवधूत म्हणाला. त्यानंतर समीर वानखेडेंनी उत्तर दिलं. ते म्हणाले, “कुठला राग नाही, कुठलं प्रेम नाही, फक्त शुभेच्छा आहेत.”

विमानतळावर तुम्ही मुद्दाम सेलिब्रिटींची जास्त तपासणी करता? समीर वानखेडे म्हणाले, “ज्यांना तुम्ही सेलिब्रिटी वगैरे म्हणता…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समीर वानखेडे विमानतळावर कर्तव्यावर होते. त्यावेळी ते मुद्दाम, प्रसिद्धी मिळविण्यासाठी सेलिब्रिटींची जास्त तपासणी करायचे, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर समीर वानखेडे म्हणाले, “माझ्यासाठी सेलिब्रिटी बाबा आमटे, सिंधुताई सपकाळ आणि एपीजे अब्दुल कलाम आहेत. एअरपोर्टवर असताना जवळपास साडेतीन हजार केसेस होत्या. त्यापैकी तुमच्या भाषेत ज्यांना तुम्ही सेलिब्रिटी वगैरे म्हणता ते किती असतील, फक्त ५०, १००, १५०. बाकीचे लोक कोण आहेत? बाकीचे लोक हे गंभीर गुन्हेगार, ड्रग पेडलर्स असतात. त्यांच्याबद्दल कुणीच काही सांगत नाही.”