‘कांतारा’ या चित्रपटाने रचलेला इतिहास सर्वश्रुत आहेच. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई केली. या चित्रपटाने जशी रिषभ शेट्टीला नवी ओळख मिळाली तशीच त्यातील वन अधिकाऱ्याची भूमिका साकारणारा अभिनेता किशोर सध्या चर्चेत आहे. चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं कौतुक झाले आहे. ट्वीटरने त्याचे अकाउंट ब्लॉक केले होते यामुळे तो चांगलाच चर्चेत आला होता.
नुकतंच त्याने एका मुलाखतीमध्ये गेल्यावर्षीच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या कन्नड चित्रपट ‘केजीएफ चॅप्टर २’बद्दल वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. हा असा डोकं बाजूला ठेवून बघायचा चित्रपट पाहण्यापेक्षा मी एखादा आशयघन चित्रपट पाहणं पसंत करेन असं वक्तव्य त्याने केलं आहे.
आणखी वाचा : “लाखो गरीब लोक…” ट्रेनच्या दरवाजात बसून प्रवास करणाऱ्या सोनू सूदने मागितली रेल्वेची माफी, ट्वीट चर्चेत
इंडिया टूडेशी संवाद साधतान किशोर म्हणला, “हे योग्य आहे की नाही मला ठाऊक नाही, पण मी ‘केजीएफ चॅप्टर २’ पाहिलेला नाही. हा माझ्या पठडीतील चित्रपट नाही. ही प्रत्येकाची वैयक्तिक आवड आहे. असा निर्बुद्ध चित्रपटा बघण्यापेक्षा मी एखादा कमी यशस्वी पण गंभीर आणि आशयघन चित्रपट पाहणं पसंत करेन.”
किशोर उत्तम अभिनेता आहेच तो सोशल मीडियावरदेखील सक्रीय असतो. चित्रपटाच्याबरोबरीने तो राजकारण सामाजिक विषयांवर भाष्य करत असतो. कन्नड चित्रपट ‘अट्टाहासा’ मधील वीरप्पनची भूमिका त्याची विशेष गाजली. केवळ कन्नडच नव्हे तर तामिळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये तो काम करतो. याबरोबरच तो आता लवकरच एका हिंदी चित्रपटात झळकणार आहे.