‘कांतारा’ नावाचं वादळ काही केल्या शांत व्हायचं नाव घेत नाहीये. दिवसागणिक या चित्रपटाची लोकप्रियता खूपच वाढत आहे. कन्नड भाषेत तर या चित्रपटाने कमाल केली आहेच, पण आता इतरही भाषेत डब होऊन या चित्रपटाने कमाईच्या आकड्यात सगळ्यांना मागे टाकलं आहे. या चित्रपटासाठी रिषभ शेट्टीने घेतलेल्या मेहनतीबद्दल सगळ्यांनाच ठाऊक आहे. याचविषयी त्याने आता आणखी खुलासा केला आहे.

चित्रपटातील दैव कोलाच्या चित्रीकरणाआधी तब्बल ३० दिवस रिषभने मांसाहार वर्ज्य केला असल्याचं स्पष्ट झालं आहे. टाइम्स ऑफ इंडियाशी संवाद साधताना त्याने या त्याच्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे. रिषभ म्हणाला, “या चित्रपटात अभिनय करणं खूप कठीण काम होतं. त्या दैव कोलाच्या दरम्यान शरीरावर एवढा मोठा पोशाख घेऊन वावरणं फारच कठीण होतं. त्या दृश्याच्या चित्रीकरणाच्या २० ते ३० दिवस आधी मी मांसाहार बंद केला होता. दैव कोला करताना एकदा ती आभूषण, अलंकार घातले की मी फक्त नारळ पाणी प्यायचो, बाकी काहीच खात नसे. चित्रीकरण झाल्यानंतर आणि त्याच्या आधी सगळे मला प्रसाद द्यायचे.”

आणखी वाचा : कपाळी शेंदूर, हातात मोदक; ‘कांतारा’ स्टार रिषभ शेट्टी सिद्धीविनायकाच्या चरणी लीन

हे सगळं करताना रिषभच्या डोळ्यासमोर बऱ्याचदा अंधारी यायची, पण केवळ सेटवरील सगळ्यांचा उत्साह कमी होऊ नये यासाठी रिषभ कायम स्वतःकडे लक्ष द्यायचा. शिवाय चित्रपटातील एका साहसदृश्यादरम्यान रिषभची पाठ आगीने भाजूनदेखील निघाली होती. हे सगळं कठीण होतं, पण या गोष्टीचा त्यांनी ध्यास घेतला होता असं रिषभने या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Rishab Shetty (@rishabshettyofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रपटाच्या कमाईचे आकडे दिवसागणिक वाढतच आहेत. जगभरात या चित्रपटाने २०० कोटीचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाची लोकप्रियता एवढी वाढली आहे की याचा दूसरा भागही काढावा अशी मागणी होताना दिसत आहे. रिषभ शेट्टी याने अजूनतरी असा काही विचार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ३० सप्टेंबरला प्रदर्शित होऊन अजूनही चित्रपटगृहाकडे प्रेक्षकांना खेचून आणणारा ‘कांतारा’ हा कन्नड चित्रपटविश्वातील अत्यंत महत्त्वाचा चित्रपट आहे.