बहुप्रतिक्षित ’83’ या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर बॉलिवूड आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने २५ जून १९८३ रोजी विश्वचषक जिंकत इतिहास रचला होता. याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट आहे. या चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री दीपिका पादुकोण ही कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर कपिल देव यांच्या पत्नीसह कुटुंबियांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.

आगामी 83 या चित्रपटाबद्दल बोलताना कपिल देव म्हणाले की, या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर कपिल देव यांच्या कुटुंबियांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. कपिल देव यांनी दिलेल्या माहितीनुसार, “या चित्रपटात पत्नी रोमी देवीची भूमिका दाखवण्यात आली आहे की नाही, हे मला माहिती नव्हते. त्यामुळे ती चित्रपटात नेमकं काय करतेय हे इतरांना सांगणे फार कठीण आहे.”

यासोबत त्यांनी रणवीर सिंगच्या अभिनयाचे कौतुकही केले आहे. यावेळी त्यांनी त्याला ‘उत्कृष्ट अभिनेता’ म्हटले आहे. या चित्रपटात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. तर दीपिका पादुकोण त्यांच्या पत्नी रोमी देवची भूमिका साकारत आहे.

हेही वाचा : Video: ‘जान लगा के देश के लिए खेलना’, रणवीर सिंगच्या 83चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

’83’ हा चित्रपट २४ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या पूर्वी हा चित्रपट ४ जून २०२१ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. रणवीरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली होती. मात्र करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

’83’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळली आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क, चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच अभिनेत्री दीपिका पादुकोण कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. आता चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत.