कॉमेडीन कपिल शर्माने आजवर आपल्या विनोदाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केले आहे. आता तो नेटफ्लिक्स स्पेशल ‘आय अॅम नॉट डन येट’ शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. २८ जानेवारी रोजी हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला. या शोमध्ये कपिलने त्याच्या खासगी आयुष्यातील अनेक किस्से सांगितले आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांच्या चाहत्यांनी एका ट्वीटमुळे सुनावले होते असा खुलासा त्याने केला आहे.

हा किस्सा सांगताना कपिल म्हणाला, ‘२०१४ मध्ये जेव्हा पंतप्रधान निवडणुकीसाठी २ मोठे उमेदवार लढत होते. त्यामधील एका उमेदवाराने माझे नाव रॅलीमध्ये घेतले होते. मी त्यांचे नाव घेणार नाही कारण ते अजूनही पंतप्रधान आहेत. त्यांनी एका रॅलीमध्ये म्हटले की राहुल गांधी इतके विनोद करतात की त्यामुळे कपिल शर्मा शो बंद होणार आहे. मला राजकारणातले फारसे काही कळत नाही. मी तो व्हिडीओ घेतला आणि माझ्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केला. त्यानंतर मला कळाले की राहुल गांधी यांची फॅन फॉलोइंग कमी नाही. मला हिंदीत तर शिव्या पडल्या पण इटालियन भाषेत देखील पडल्या. मी विचार केला आता शिव्या खाऊया कारण पास्ता पण खातो आपण.’
धर्मवीर’: आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची प्रविण तरडेंकडून घोषणा, पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कपिल शर्माने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी केलेले ट्वीट देखील चर्चेत होते. त्याने हे ट्वीट दारुच्या नशेत केल्याचे मान्य केले होते. “मी गेल्या पाच वर्षांपासून १५ कोटींचा आयकर भरत असतानाही माझं ऑफिस तयार करण्यासाठी पालिकेला पाच लाखांची लाच द्यावी लागत आहे,” असं कपिल शर्माने या ट्वीटमध्ये सांगितलं होतं. यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. पालिकेने यानंतर कपिल शर्माच्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई केली होती. या ट्वीटनंतर कपिल मालदीवला निघून गेला होता.