बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री करिना कपूर पाकिस्तानच्या एका मोबाईल कंपनीची ब्रँण्ड अॅम्बेसेडर बनली आहे. पाकिस्तानमधल्या सर्वात लोकप्रिय अशा ‘क्यू मोबाईल’शी करीनाने करार केला आहे. त्यामुळे लवकरच करीना ‘क्यू मोबाईल’च्या जाहिराती झळकणार आहे.
जाहिरातीच्या शुटींगचे काम पूर्ण झाले आहे. थायलंडमध्ये या जाहिरातचे चित्रीकरण झाल्याची माहिती ‘क्यू मोबाईचा’ मार्केटींग अधिकारी जीनाश कुरेशी याने दिली आहे. ही मोबाईल क्षेत्रातील ही सर्वांत महागडी जाहिरात असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. करिनाचा पाकिस्तानातही मोठा चाहता वर्ग असल्यामुळे तिची या जाहिरातीसाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या या पाकिस्तानी चाहत्यांना खूश करण्यासाठी करिना सज्ज झाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Dec 2013 रोजी प्रकाशित
पाकिस्तानच्या मोबाईल कंपनीची ब्रँण्ड अॅम्बेसेडर करिना!
बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री करिना कपूर पाकिस्तानच्या एका मोबाईल कंपनीची ब्रँण्ड अॅम्बेसेडर बनली आहे.

First published on: 23-12-2013 at 10:28 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kareena kapoor becomes the face of pakistans mobile company