बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सध्या तिचा आगामी चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’मुळे चर्चेत आहे. अभिनेता आमिर खानसोबत ती या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आमिर आणि करीनाची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी दिलेल्या एका मुलाखतीत करीनाने मागच्या काही काळापासून मानधन वाढवल्याच्या मुद्द्यावरू तिच्यावर सतत्याने होणाऱ्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, मानधनात वाढ केल्याच्या मुद्द्यावर भाष्य करताना करीना कपूर म्हणाली, “मला वाटतं यामुळे कोणालाही समस्या असू नये. कारण कोणता अभिनेता किंवा अभिनेत्री एखाद्या भूमिकेसाठी किंवा चित्रपटासाठी किती मानधन घेतात हे कोणालाच माहीत नसतं. याबाबतचे जे नंबर समोर येतात या केवळ अफवा असतात. त्यामुळे जेव्हा यावरून लोक ट्रोल करतात तेव्हा त्यावर स्पष्टीकरण देणं मी गरजेचं समजत नाही.”

आणखी वाचा- Koffee with Karan 7 नंतर विजय देवरकोंडा आहे करण जोहरवर नाराज? नेमकं काय आहे सत्य

करीना पुढे म्हणाली, “हा माझा खासगी विषय आहे. याबाबत इतर कोणालाही काही सांगणं मला गरजेचं वाट नाही. एखाद वेळेस मी एक रुपयाही न घेताही मोफत चित्रपट करेन. पण त्यावेळी त्याची चर्चा होईल का? अभिनय हे माझं प्रेम आणि मी माझं काम प्रामाणिकपणे करते. त्यासाठी मी किती मानधन घेते याच्यावर कोणालाही आक्षेप असू नये असं मला वाटतं.”

आणखी वाचा- ‘लाल सिंग चड्ढा’साठी करीना नव्हे तर ‘या’ अभिनेत्रीला होती पहिली पसंती, आमिर खानचा खुलासा

याशिवाय सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर बोलताना करीना म्हणाली, “मी ट्रोलर्सवर फारसं लक्ष देत नाही. कोण काय कमेंट करतं याकडे मी दुर्लक्ष करते. त्यामुळे मला याने फारसा फरकही पडत नाही. मी एक सकारात्मक व्यक्ती आहे. मी नेहमीच चांगल्या मूडमध्ये असते. मग ते माझे चाहते असो किंवा सेलिब्रेटी फोटोग्राफर. ट्रोलर्स मला ओळखत नाही त्यामुळे ते फक्त कमेंट करतात. पण मला याने काहीच फरक पडत नाही.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kareena kapoor khan reacts on trolls about the fee hike mrj
First published on: 11-08-2022 at 09:08 IST