बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आगामी ‘गब्बर’ चित्रपटात केवळ एका गाण्या पुरती दिसणार नसून, ती अक्षय कुमारच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. करिना कपूरच्या जवळच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, ‘गब्बर’मध्ये करिना अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या सुरुवातीलाचा तिचा खून होतो. त्यामुळे अक्षयला सतत तिची आठवण येत राहते, जे चित्रपटात फ्लॅशबॅकच्या स्वरुपात दाखविण्यात आले आहे. बेबोची ही भूमिका आदित्य चोप्राच्या ‘मोहब्बते’ चित्रपटातील एश्वर्या रायच्या भूमिकेशी मिळतीजूळती आहे. ‘महोब्बते’ चित्रपटात प्रमुख स्त्री पात्राचा आत्मा एश्वर्या रायच्या रुपाने संपूर्ण चित्रपटभर फिरताना दाखविण्यात आला आहे. ‘गब्बर’ चित्रपटात आशाचप्रकारची भूमिका करिना साकारत आहे. ‘रामना’ या मूळ तामिळ चित्रपटात सिमरनने साकारलेली भूमिका गब्बर चित्रपटात करिना साकारत आहे.