इम्तियाज अली यांचा ‘रॉकस्टार’ हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम आणि सर्वाधिक कौतुकास्पद चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत होता आणि नर्गिस फाखरीने या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.

तुम्हाला माहिती आहे का की इम्तियाज यांनी ‘रॉकस्टार’साठी नर्गिसला नाही तर करीना कपूरला विचारले होते. इम्तियाज अली ‘जब वी मेट’मधील करीनाच्या अभिनयाने खूप प्रभावित झाले होते आणि सुरुवातीला त्यांनी तिला ‘रॉकस्टार’मध्ये नायिका बनवण्याचा विचार केला होता. काही कारणास्तव ते शक्य झाले नाही आणि करीनाच्या जागी ही भूमिका नर्गिसला देण्यात आली.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, रणबीर कपूरने हे उघड केले होते आणि सांगितले होते की करीना मेहनती आहे आणि तिला इम्तियाजसह अनेक प्रतिभावान दिग्दर्शकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. परंतु, त्याला वाईट वाटते की त्यांच्या भावा-बहिणीच्या नात्यामुळे तो या चित्रपटात तिच्याबरोबर काम करू शकला नाही.

रणबीर पुढे म्हणाला, ‘आम्ही एकत्र काम करू शकलो नाही याचे मला वाईट वाटते, पण आम्हाला नक्कीच दुसऱ्या चित्रपटात एकत्र काम करायला आवडेल, चाहते अजूनही वाट पाहत आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर करीनाबरोबर काम करू शकला नाही, पण त्याला त्याचे आजोबा शम्मी कपूर यांच्याबरोबर काम करण्याची संधी नक्कीच मिळाली. शम्मी कपूर यांनी चित्रपटात उस्ताद जमील खानची भूमिका साकारली होती. त्या वर्षीच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी ‘रॉकस्टार’ हा एक चित्रपट होता.

रॉकस्टारचे दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केले होते आणि या संगीतमय रोमँटिक ड्रामामध्ये रणबीर कपूर आणि नर्गिस फाखरी यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्याशिवाय अदिती राव हैदरी, पियुष मिश्रा, कुमुद मिश्रा, शम्मी कपूर यांसारखे कलाकार चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत होते. चित्रपटाचे संगीत ए. आर. रहमान यांनी दिले होते. २०११ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्या वर्षीच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता.