बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी रणवीरने ‘पेपर’ या मासिकासाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर सध्या चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे. त्याचे हे फोटो पाहून अनेकजण त्याला ट्रोल करत आहे. तर काहींनी त्याला समर्थन दिलं आहे. बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनी तर रणवीरला पूर्णपणे पाठिंबा दिलाय. अभिनेत्री करीना कपूरने देखील रणवीरला पाठिंबा दिलाय. लोकांकडे खूप रिकामा वेळ आहे असं ती म्हणाली.
करीना कपूर सध्या तिच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकत्याच एका मुलाखतीत रणवीरला ट्रोल करणाऱ्यांवर प्रतिक्रिया दिलीय. इंडिया टुडेला करीनाने नुकतीच मुलाखत दिली. यावेळी तिला रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर करीना म्हणाली, “मला वाटतं अशा मुद्द्यावर सगळ्यांनाच बोलायचं असतं. अनेकांना अशा गॉसिप्सवर चर्चा करायला आवडतं किंवा मत मांडायला आवडतं. अलिकडे अशा मुद्द्यांवर मत मांडायला आणि चर्चा करायला लोकांकडे खूप रिकामा वेळ आहे. लोकांसाठी ही एवढी मोठी गोष्ट का आहे, हेच मला कळत नाहीय. मी जसं म्हणाले तसं लोकांकडे अलिकडे खूपच जास्त वेळ आहे वाटतं. “
हे देखील वाचा: रणवीरनंतर विजय देवरकोंडाला करायचंय न्यूड फोटोशूट, म्हणाला “मी तयार फक्त…”
हे देखील वाचा: “यासाठी कोणाला शिक्षा…” रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर जान्हवी कपूरची प्रतिक्रिया
करीना कपूरप्रमाणे अभिनेत्री विद्या बालन आणि जान्हवी कपूरने देखील रणवीरला पूर्णपणे पाठिंबा दिला होता. कोणत्याही कलाकाराला त्याच स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी शिक्षा देण्याची गरज नाही असं जान्हवी म्हणाली होती. तर विद्या बालनने देखईल रणवीरच्या फोटोशूटवर प्रतिक्रिया दिली होती. “जर कुणाला हे फोटोशूट आवडलं नसेल तर त्याने ते पाहू नये आणि डोळे मिटून ठेवावे.” असं विद्या म्हणाली होती.